नागपूर - नागपूर पोलिसांना दुपारी एकच्या सुमारास नागपूर पोलिसांना राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी देणारा निनावी फोन आला. त्या फोन कॉलमध्ये संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
Breaking News : नागपूरचे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी - ईटीव्ही भारत ब्रेकिंग न्यूज
19:30 December 31
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मुख्यालय उडवून देण्याची धमकी
19:09 December 31
आयआयटीच्या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या पोलिसाला अटक
मुंबई - नवी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेच्या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे सानपाडा येथील पाम बीच रोडवर घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, ती गुरुवारी रात्री उशिरा मुंबईतील पवई येथील आयआयटी कॅम्पसमधून वर्गमित्राला भेटण्यासाठी सानपाडा परिसरात आली होती. त्यावेळी हा प्रकार घडला.
19:04 December 31
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणार्या व्यक्तीला अटक
मुंबई - नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईसह काही ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी नरेंद्र कवळे याला शुक्रवारी रात्री 8.56 ते 9.20 च्या दरम्यान पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल केल्यानंतर मध्य मुंबईतील धारावी येथून अटक करण्यात आली.
19:01 December 31
6.53 लाख रुपयांच्या कोकेनसह नायजेरियन व्यक्तीला अटक
ठाणे - एका नायजेरियन व्यक्तीला 6.53 लाख रुपयांच्या कोकेनसह अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्याला शुक्रवारी मीरा रोड येथून गुन्हे शाखेच्या युनिट व्ही (वागळे इस्टेट) च्या पथकाने ताब्यात घेतले, असे वरिष्ठ निरीक्षक विकास बोडके यांनी सांगितले.
18:49 December 31
ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये नवीन वर्ष २०२३ च्या स्वागताची जल्लोषात सुरुवात
सिडनी - ऑस्ट्रेलिया नवीन वर्ष २०२३ ची सुरुवात सिडनीमध्ये फटाक्यांसह साजरी करण्यात येत आहे. ऑपेरा हाऊस परिसर रोषणाईने उजळून निघाला आहे. मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी करण्यात येत आहे.
17:40 December 31
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मरीन लाईन्स येथे गर्दी
मुंबई - सरत्या वर्षाला गुडबाय करण्यासाठी तसेच नव्या वर्षाचे वेलकम करण्यासाठी मरीन लाईन्स येथे मुंबईकरांनी गर्दी केली आहे. मुंबईकरांच्याबरोबरच जगभरातून पर्यटकही मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आले आहेत. विविध कार्यक्रम त्यासाठी आयोजित करण्यात आले आहेत.
16:58 December 31
न्यूझीलंडमध्ये जल्लोषात नवीन वर्ष 2023 चे स्वागत
न्यूझीलंडमधील लोकांनी फटाक्यांची रोषणाई आणि लाइट शोमध्ये नवीन वर्ष 2023 चे आनंदाने स्वागत केले. ऑकलंडमध्ये मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली. त्याचा आनंद जनतेसह पर्यटकांनी घेतला.
15:58 December 31
माजी पोप एमेरिटस बेनेडिक्ट सोळावे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन
व्हॅटिकन - माजी पोप एमेरिटस बेनेडिक्ट सोळावे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. व्हॅटिकनमधील संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
15:31 December 31
सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी मजुराला जन्मठेपेची शिक्षा
ठाणे - जिल्ह्यातील न्यायालयाने एका 28 वर्षीय मजुराला सहकाऱ्याची हत्या आणि इतर दोघांना जखमी केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अभय जे मंत्री यांनी गुरुवारी आरोपींना भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली दोषी ठरवले आणि 3,000 रुपयांचा दंडही ठोठावला.
15:10 December 31
बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी केली जाळपोळ
गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील गट्टा ते गट्टागुडा मार्गावर पुलाच्या बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याने त्या भागात दहशतीचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. गुरुवारी भामरागड तालुक्यातील तुमरकोठी येथील गाव पाटलाची हत्या केल्याची घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यात जाळपोळ केली.
14:41 December 31
साताऱ्यात माजी भाजप आमदाराच्या बंगल्यामागे अर्धवट पुरलेला महिलेचा मृतदेह सापडला
पुणे - सातारा जिल्ह्यातील एका गावात भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदाराच्या बंद बंगल्याच्या मागे एका महिलेचा कुजलेला मृतदेह अर्धवट पुरलेला आढळून आला. पोलिसांनी ही माहिती दिली. याप्रकरणी संपूर्ण आणि सखोल तपास केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
14:06 December 31
बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाकडे मुंडे भगिनींनी फिरवली पाठ
बीड - भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या पक्षात नाराज असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यक्रमाला आले आहेत. पण, या कार्यक्रमाला मुंडे भगिनी अनुपस्थितीत असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
13:31 December 31
नारायण राणे राज ठाकरे यांच्या भेटीला येणार
मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे राज ठाकरे यांच्या भेटीला येणार आहेत. दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी ते भेट घेणार आहेत. दोन नेत्यांच्या भेटीने उत्सुकता वाढली आहे. उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक राणे राज यांच्या भेटीला वेगळे महत्व आहे.
13:01 December 31
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसचे मानले आभार
राहुल गांधी पत्रकारांशी बोलताना आज म्हणाले की, जेव्हा मी यात्रा सुरू केली, तेव्हा मी ती कन्याकुमारी ते काश्मीर अशी सामान्य यात्रा म्हणून घेतली. या यात्रेला आवाज आणि भावना आहेत हे हळूहळू समजले. मी भाजप आणि आरएसएसच्या लोकांचे मी आभार मानू इच्छितो, कारण ते जितके आम्हाला लक्ष्य करतात तितके ते आम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करतात असेही खासदार राहुल गांधी म्हणाले.
12:53 December 31
ऋषभ पंतला प्लास्टिक सर्जरीसाठी दिल्लीला हलवले जाण्याची शक्यता
नवी दिल्ली - दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक श्याम शर्मा म्हणाले की, क्रिकेटर ऋषभ पंतच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डीडीसीएची एक टीम डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. गरज भासल्यास प्लास्टिक सर्जरीसाठी विमानाने पंतला दिल्लीला नेले जाईल.
12:31 December 31
तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरण - शीझानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी वसई न्यायालयाने आरोपी शीझानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
12:08 December 31
तुनिषा आत्महत्या प्रकरणी आरोपी शीझान खानला न्यायालयात हजर करणार
पालघर - वालीव पोलीस तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणातील प्रमुख आरोपी टीव्ही अभिनेता शीझान खान याला शनिवारी पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला वसई न्यायालयात हजर करणार आहेत.
12:05 December 31
आशिष शेलार यांच्या नावाने बनावटगिरी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई - भाजप आमदार आशिष शेलार यांच्या पीएने तक्रार दाखल केल्यानंतर वांद्रे पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. एका व्यक्तीने आशिष शेलार यांच्या नावाचा वापर करून त्यांना बीएमसीमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. वांद्रे पोलीस याचा तपास करत आहेत.
11:35 December 31
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 2 मार्च पासून
मुंबई - राज्यातील दहावी आणि बारावी शिक्षण मंडळातर्फे 2023 मध्ये फेब्रुवारी मार्च या काळात लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी व दहावी परीक्षा 2 मार्च पासून सुरू होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक मंडळाने नुकतेच जाहीर केलेले आहे. राज्यामध्ये एकूण नऊ विभागीय मंडळ आहेत. यामध्ये कोकण, लातूर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे, नागपूर व मुंबई इत्यादी विभाग येतात या सर्व विभागातील दहावी आणि बारावीची परीक्षा मंडळाकडून घेतली जाते.
10:14 December 31
Breaking News : मीरा रोड परिसरातील हत्या प्रकरण! वसई विरार गुन्हे शाखेकडून एकाला अटक
मुंबई - मीरा-भाईंदर-वसई विरार (MBVV) आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मीरा रोड परिसरात एका महिलेची आणि तिच्या 4 मुलांची हत्या झाली होती. त्यातील 28 वर्षांच्या राजकुमार चौहान या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी, अनिल सरोज आणि सुनील सरोज अजूनही फरार आहेत
08:30 December 31
Breaking News : बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे विद्यार्थिनींच्या सहलीच्या बसला अपघात, तीन मुली गंभीर
पुणे - बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे विद्यार्थिनींच्या सहलीच्या बसला अपघात झाला आहे. यामध्ये तीन मुली गंभीर तर चोवीस मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. शिर्डी वरून इचलकरंजीला परतीचा प्रवास करत असताना ही घटना घडली आहे.
06:44 December 31
Breaking News : दिल्लीतील प्रीत विहारमध्ये जिम मालकाची गोळ्या झाडून हत्या
नवी दिल्ली - दिल्ली येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील प्रीत विहारमध्ये जिम मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
06:28 December 31
Breaking News : जागतिक आरोग्य संघटनेने चीनला कोरोना परिस्थितीवरील ताजा अहवाल सार्वजनिक करण्यास सांगितले
नवी दिल्ली - कोविड प्रकरणांमध्ये सध्याच्या वाढीवर चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमने चीनच्या प्रतिनिधींशी भेट घेतली आहे. डब्ल्यूएचओने कोरोनासंदर्भातील अचूक माहिती तयार करण्यासाठी तसेच, ताजी माहिती देण्यासह पारदर्शक गोष्टींवर सध्या भर दिला आहे. तसेच, चीनलाही याबाबतची योग्य माहिती सार्वजनिक करण्यास सांगिगतले आहे.