ETV Bharat / state

मुंबईत मुसळधार : लोकल सेवेवर परिणाम, प्रवाशांचे हाल

मुंबईत सलग 5 दिवस पाऊस सुरू आहे. कधी मुसळधार, कधी संततधार पडणाऱ्या पावसाने मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगराला झोडपून काढले.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 27, 2019, 8:02 PM IST

मुंबई - हवामान खात्याने 26 जुलैपासून 3 ते 4 दिवस मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाने मुंबईला झोडपले. शुक्रवारी पडलेल्या या पावसामुळे मुंबई तसेच कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर झाला. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला.

मुंबईत सलग 5 दिवस पाऊस सुरू आहे. कधी मुसळधार, कधी संततधार पडणाऱ्या पावसाने मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगराला झोडपून काढले. दादर, परळ, वांद्रे, अंधेरी, सांताक्रुझ, मालाड, गोरेगाव, सायन, कुर्ला, विद्याविहार, मुलुंड, भांडुप, कांजूर ते विक्रोळी-घाटकोपर आदी भागात गुडघाभर पाणी साचले होते. अनेक सखल भागातही पाणी साचले होते. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, वांगणी आदी ठिकाणी पाणी साचल्याने कल्याण ते कर्जत आणि खोपोली पर्यंतची वाहतूक बंद पडली. त्यामुळे या ठिकाणचे प्रवाशी मुंबईत येऊ शकले नाहीत. परिणामी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या कमी होती. कल्याण ते कर्जत खोपोली पर्यंतची सेवा सायंकाळी 6 पर्यंत पूर्ववत झालेली नव्हती.

किती पडला पाऊस -

26 जुलै रोजी सकाळी साडेआठपासून 27 जुलै रोजी सकाळी साडेआठपर्यंत कुलाब्यात 90 मिमी. तर सांताक्रूझ येथे 291 मिमी पावसाची नोंद झाली. तर आज सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच या 5 तासात कुलाबा येथे 13.8 मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे 9.1 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली.

तलाव क्षेत्रातही दमदार पाऊस -

गेल्या 4 दिवसांत तलाव क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तलावांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे सातही तलावांत मिळून 10 लाख 7 हजार 623 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे.

Intro:मुंबई -
हवामान खात्याने २६ जुलैपासून तीन ते चार दिवस मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाने मुंबईला झोडपले. शुक्रवारी पडणाऱ्या पावसाने मुंबई तसेच कल्याण परिसरात पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या लोकलसेवेवर परिणाम झाला. यामुळे मुंबईकर व प्रवाशांचे हाल झाले. Body:मुंबईत सलग पाच दिवस पावसाने ठाण मांडले आहे. कधी मुसळधार, कधी संततधार पडणाऱ्या पाऊस शुक्रवारी सायंकाळी ६ नंतर जोरदार बरसला. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात झोडपून काढले. दादर, परळ, वांद्रे, अंधेरी, सांताक्रुझ, मालाड, गोरेगाव, सायन, कुर्ला, विद्याविहार, मुलुंड, भांडुप, कांजूर ते विक्रोळी-घाटकोपर आदी भागात गुडघाभर पाणी साचले होते. अनेक सखल भागातही पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातून मुंबईकरांना वाट काढात घर गाठावे लागले.

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, वांगणी आदी ठिकाणी पाणी साचल्याने कल्याण ते कर्जत आणि खोपोली पर्यंतची वाहतूक बंद पडल्याने या ठिकाणचे प्रवाशी मुंबईत येऊ शकले नसल्याने लोकलमध्ये प्रवाशांची संख्या कमी होती. कल्याण ते कर्जत खोपोली पर्यंतची सेवा सायंकाळी सहा पर्यंत पूर्ववत झालेली नव्हती. मुंबईत शनिवारी पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना काहीसे हायसे वाटले. शुक्रवार संध्याकाळपासून पडणाऱ्या पावसाने रात्रभर मुंबईत अनेक ठिकाणी पाणीसाचल्याने मुंबईकरांनी घरी राहणेच पसंद केले.

किती पडला पाऊस -
२६ जुलै रोजी सकाळी ८.३० पासून २७जुलै रोजी सकाळी ८.३० पर्यंत कुलाब्यात ९० मिमी. तर सांताक्रूझ येथे २९१ मिमी पावसाची नोंद झाली. तर आज सकाळी ८.३० ते दुपारी २.३० या पाच तासात कुलाबा येथे १३.8 मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे ९.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तलाव क्षेत्रातही दमदार पाऊस -
गेले चार दिवसांत तलाव क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तलावांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे सातही तलावांत मिळून १० लाख ७ हजार ६२३ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. 

बातमीसाठी पावसाचे vis वापरावेतConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.