मुंबई : राज्यातील शारीरिक शिक्षण विकास होण्यासाठी, त्यासाठीचे संचालक पद यांची भरती त्वरित करावी तसेच राज्यातील शेकडो ग्रंथालयांमध्ये ग्रंथपाल व हजारो प्रयोगशाळांमध्ये प्रयोगशाळेचे सहाय्यकांची पदे तात्काळ भरण्यात यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( DCM Devendra Fadvanis ) यांनी दिले.
ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक पद भरतीचे आदेश - राज्यामध्ये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्यांमध्ये त्यांना मिळणारे अनुदान दरामध्ये 60 टक्के वाढ करण्याची सूचना उपमुख्यंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत करण्यात आली. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या ग्रंथपाल तसेच प्रयोगशाळा सहाय्यक पदे तातडीने भरण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले आहेत. बैठकीच्या वेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
अनेक दिवसांपासून सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न प्रलंबित - शारीरिक शिक्षण हा महत्वाचा भाग आहे. त्या विभागचे संचालक पद भरले गेले नव्हते. मात्र आजच्या आदेशाने आता या विभागला पूर्ण वेळ शिक्षण संचलक मिळणार आहे. तसेच वर्षानुवर्षे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न प्रलंबितच आहेत. त्यामुळे सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची ससेहोलपट झाली आहे. २०१२ नंतर शासनाने अनुदानवाढ, वर्गवाढ केलेली नाही. नवीन ग्रंथालयांना मान्यताही दिलेली नाही. त्यामुळे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला खो बसला आहे. जिल्ह्यातील सुमारे साठ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना नवसंजीवनी देण्याचे कार्य शासनाने करणे काळाची गरज बनली आहे.