ETV Bharat / state

आयआयटीच्या प्राध्यापकांनी बनवले रिमोटवर चालणारे सॅनिटाइझ यंत्र

author img

By

Published : May 8, 2020, 8:34 PM IST

आयआयटी मुंबईतील संशोधकांनी एकाचवेळी जास्तीत जास्त भाग निर्जंतूक करता यावा, यासाठी रिमोटवर चालणारे उपकरण विकसीत केले आहे.

IIT professors made Remote Sanitize Machine  in mumbai
आयआयटीच्या प्राध्यापकांनी बनवले रिमोटवर चालणारे सॅनिटाइझ यंत्र

मुंबई - आयआयटी मुंबईतील संशोधकांनी एकाचवेळी जास्तीत जास्त भाग निर्जंतूक करता यावा, यासाठी रिमोटवर चालणारे उपकरण विकसित केले आहे. आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक अंबरिश कुंवर आणि प्राध्यापक किरण कोंडाबगील यांनी हे उपकरण विकसित केले आहे. याचे प्रोटोटाइप आयआयटी मुंबईच्या संकुलातील रुग्णालयात वापरात आणले आहे. रुग्णालयाने याचा वापर रिकाम्या खोल्यांमध्ये केला आहे.

अनेकदा एखादा परिसर निर्जंतुक करण्यासाठी अनेकदा माणसांना त्या परिसरात जावे लागते. मात्र, त्यात अनेक धोके असू शकतात. हे धोके कमी व्हावे, या उद्देशाने रिमोटवर चालणारे हे उपकरण विकसीत करण्यात आले आहे. यामुळे एका खोलीत बसून एखादी व्यक्ती हे उपकरण रिमोट कंट्रोलद्वारे वापरू शकते. यामुळे ते उपकरण पाहिजे त्या कोपऱ्यात जाऊन सॅनिटायझेशन करता येऊ शकणार आहे. या सॅनिटायझरच्या उपकरणाचे रोबोमध्ये रुपांतर करण्यासाठी आयआयटीमधील इंडस्ट्रीअल डिझाइन सेंटरमधील प्राध्यापक काम करणार असल्याचेही प्रा. कुंवर यांनी सांगितले.

लॉकडाऊन उठल्यावर जेव्हा सर्व वाहतूक यंत्रणा, शाळा, कॉलेजे, शॉपिंग मॉल्स सुरू होतील, तेव्हा ते सॅनिटाइझ करावे लागतील. इतकेच नव्हे तर ते वारंवार सॅनिटाइझ करावे लागणार आहे. अशावेळी या उपकरणाचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो असा विश्वासही संशोधकांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.