ETV Bharat / state

IIT Student Death Case : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण; आरोपी बॅचमेटने वापरलेले कटर जप्त

author img

By

Published : Apr 13, 2023, 9:27 AM IST

मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने एक कटर जप्त केला आहे. जे आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या बॅचमेटने त्याला धमकी देण्यासाठी वापरला होते, असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.याप्रकरणी 19 वर्षीय विद्यार्थी अरमान खत्रीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेला विद्यार्थी हा दर्शनचा बॅचमेट असून, तो आणि दर्शन एकाच वस्तीगृहात राहत होते.

IIT Bombay
आयआयटी विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या

मुंबई : IIT मुंबईत शिकणाऱ्या दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने १२ फेब्रुवारीला वसतिगृहाच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. अरमान खत्रीने पीडितेला धमकावण्यासाठी वापरलेला कटर मंगळवारी पूर्वीच्या वसतिगृहाच्या खोलीतून जप्त करण्यात आले आहे. खत्रीला चौकशीसाठी त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत नेल्यानंतर ते जप्त करण्यात आले,असे अधिकाऱ्याने सांगितले. सोळंकी यांच्याशी झालेल्या वादाचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी खत्री यांची चौकशी करण्यात येत आहे.

एसआयटीची स्थापना: मूळचा गुजरातमधील अहमदाबादचा असलेला आणि बीटेक (केमिकल) अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या सोळंकीने यावर्षी १२ फेब्रुवारी रोजी आयआयटीबी कॅम्पसमध्ये असलेल्या वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.सोलंकी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. तर दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अरमान खत्रीला अटक केली आहे.

सुसाईड नोटमधील हस्तलेखन जुळले: सोळंकी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. SIT ला अलीकडेच एका हस्तलेखन तज्ञाकडून एक अहवाल प्राप्त झाला, ज्यात असे म्हटले आहे की, संस्थेच्या वसतिगृहातून जप्त केलेले सुसाईड नोटमधील हस्तलेखन मृत व्यक्तीच्या लिखाणाच्या नमुन्यांशी जुळले आहे. हे त्याने लिहिलेले असल्याची स्पष्ट होते.IIT मुंबईत शिकणाऱ्या दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने १२ फेब्रुवारीला वसतिगृहाच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी दर्शनने सुसाईड नोट लिहिली होती. त्यावर त्याने अरमानचे नाव लिहिले होते. सुसाईड नोटमध्ये अरमानने त्याला त्रास दिल्याचा आरोप केला होता.

जातिभेदामुळे आत्महत्या: दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने आयआयटी मुंबईच्या वसतिगृहाच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. जातिभेदामुळे दर्शनने आत्महत्या केल्याचा दावा दर्शनचे कुटुंबीयांनी केला आहे. तसेच आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी देखील जातीय भेदातून आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. विविध संघटनांनी सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना करुन तपास करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा: IIT Bombay Student Death दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी बॅचमेटला अटक पोलीस कोठडीत रवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.