ETV Bharat / state

Mumbai Police : घरात भाडेकरू असेल तर माहिती द्या, अन्यथा पोलीस करणार 'ही' कारवाई - information on police portal in mumbai

बृहन्‍मुंबई हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरात राहत असलेल्या भाडेकरुंची संपूर्ण माहिती मुंबई ( Mumbai Police ) पोलिसांच्या www.mumbaipolice.gov.in या पोर्टलवर कळवावी, असे आदेश पोलीस आयुक्त संजय लाटकर ( Police Commissioner Sanjay Latkar ) यांनी दिले आहेत

Mumbai Police
Mumbai Police
author img

By

Published : Oct 30, 2022, 7:22 AM IST

Updated : Oct 30, 2022, 9:58 PM IST

मुंबई : बृहन्‍मुंबई हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरात राहत असलेल्या भाडेकरुंची संपूर्ण माहिती मुंबई ( Mumbai Police ) पोलिसांच्या www.mumbaipolice.gov.in या पोर्टलवर कळवावी, असे आदेश पोलीस आयुक्त संजय लाटकर ( Police Commissioner Sanjay Latkar ) यांनी दिले आहेत. दहशतवादी आणि काही असामाजिक घटकांकडून परिसरातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेला धोका पोहचण्याच्या शक्यता गृहित धरुन फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 च्या अधिकारानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 10 (2) कलम जारी केले आहे.

भाडेकरूविषयी सर्व तपशील त्वरित कळवण्याचे आवाहन : मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या असे आढळून आले आहे की, मुंबईत विध्वंसक, समाजविरोधी घटक हे निवासी भागात लपून बसू शकतात आणि त्यांच्या आधारे सार्वजनिक शांतता, मानवी जीवनाला गंभीर धोका आणि त्या कारणास्तव खाजगी सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याची सर्व शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी मूळ घरमालकास आपल्या घरात भाडेकरू ठेवताना त्या www.mumbaipolice.gov.in या मुंबई पोलिसांच्या पोर्टलवर ऑनलाइन कळवण्याचे आवाहन मुंबई पोलिसांचे उपायुक्त संजय लाटकर यांनी केले आहे.

त्वरित कारवाई आवश्यक : भाडेकरूंच्या वेशात दहशतवादी समाजविरोध विरोधी घटक यांच्याकडून विध्वंसक वृत्ते, दंगली, भांडणे इत्यादी घडू नयेत म्हणून घरमालक भाडेकरांची तपासणी आवश्यक्य आहे आणि या घटना घडू नयेत त्यांना आळा बसावा यासाठी त्वरित कारवाई आवश्यक असल्याचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी सांगितले. मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही घराचा वा मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालक अथवा जागा मालकव्यक्ती ज्यांनी कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. त्या भाडेकरूचे सर्व तपशील त्वरित या सिटीजन पोर्टलवर ऑनलाइन कळवण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी केले आहे.

राहण्याचे कारण नमूद करणे आवश्यक : जर अशी व्यक्ती परदेशी असेल तर मालक आणि परदेशी व्यक्ती यांनी त्याचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट तपशील म्हणजेच पासपोर्ट क्रमांक, ठिकाण आणि जारी करण्याची तारीख वैद्यता सादर करावे. व्हिजा तपशील म्हणजेच व्हिजा क्रमांक, श्रेणी, ठिकाण आणि जारी करण्याची तारीख, वैद्यता नोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे. हा आदेश ६ नोव्हेंबरपासून अंमलात येईल आणि 4 जानेवारी 2023 पर्यंत ६० दिवसांच्या कालावधीसाठी लागू राहील या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती आयपीसी 1860 च्या कलम 188 अंतर्गत दंडास पात्र असेल तसेच सर्व संबंधितांना वैयक्तिकरित्या नोटीस बजावली जाऊ शकत नसल्यामुळे याद्वारे हा आदेश एकतर्फी पारित करण्यात आला आहे. लोकांच्या माहितीसाठी आम्ही सर्व पोलीस स्टेशन, महानगरपालिका प्रभाग कार्यालयांच्या सूचना फलकांवर आणि तहसील प्रभाग कार्यालयात या आदेशाच्या प्रति चिटकवून प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती देखील संजय लाटकर यांनी दिली.

Last Updated : Oct 30, 2022, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.