ETV Bharat / state

पुरस्कारांमध्ये देखील मनमानी होत असेल तर त्याची नोंद घ्यावी लागेल- संजय राऊत - Sanjay Raut LATEST NEWS

संजय राऊत यांनी पद्म पुरस्कारांमध्ये देखील मनमानी होते का? महाराष्ट्राच्या वाट्याला जर अन्याय येत असेल तर नक्कीच त्याची नोंद घ्यावी लागेल, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. दरवर्षी महाराष्ट्रातून दहा ते बारा लोकांना पद्म पुरस्कार देण्यात येतात मात्र या वर्षी फक्त सहा लोकांनाच पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. त्याबद्दल संजय राऊत यांनी खंत व्यक्त केली.

पुरस्कारांमध्ये देखील मनमानी
पुरस्कारांमध्ये देखील मनमानी
author img

By

Published : Jan 26, 2021, 2:33 PM IST

मुंबई - केंद्रसरकार विरुद्ध राज्यसरकार हे वाद काही संपताना दिसत नाही आहे. पद्म पुरस्कारावरून सुद्धा हा वाद दिसून आला आहे. संजय राऊत यांनी पद्म पुरस्कारांमध्ये देखील मनमानी होते का? महाराष्ट्राच्या वाट्याला जर अन्याय येत असेल तर नक्कीच त्याची नोंद घ्यावी लागेल, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. दरवर्षी महाराष्ट्रातून दहा ते बारा लोकांना पद्म पुरस्कार देण्यात येतात मात्र या वर्षी फक्त सहा लोकांनाच पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. त्याबद्दल संजय राऊत यांनी खंत व्यक्त केली. राज्य सरकारकडून ज्यांना पद्म पुरस्कार द्यायचा आहे, त्यांच्या नावाची शिफारस केली जाते. मात्र राज्य सरकारने पाठवलेल्या नावांपैकी एकाही नावाला पद्म पुरस्कार देण्यात आले नसावे अशी शंकासुद्धा संजय राऊत यांनी व्यक्त केली.

पुरस्कारांमध्ये देखील मनमानी
बुलेट ट्रेन दिल्याबद्दल पुरस्कारजपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याबाबत बोलताना राऊत यांनी बुलेट ट्रेन दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असावा. महाराष्ट्राने जी बुलेट ट्रेन नाकारली, त्यासाठीच हा पुरस्कार असावा, असा टोलाही त्यांनी लगावला.नाव बघावी लागतीलज्या सहा लोकांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांची नावे राज्य सरकारच्या यादीत होती की नाही, हे पाहावे लागेल. राज्य सरकारकडून काही नावांची शिफारस केली जाते. मला वाटते त्यातल एकही नाव पुरस्कार मिळालेल्यांमध्ये नसेल, असेही ते म्हणाले.राऊत यांचे नावही होते यादीतदरम्यान, महाविकास आघाडीने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेही नाव होते. ‘सिरम’चे अदर पूनावाला, कलाकार विक्रम गोखले, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता सुबोध भावे यांचीही नावे या यादीत होते. मात्र केंद्राने मात्र यापैकी एकाच व्यक्तीची निवड केली आहे.

हेही वाचा - गलवान खोऱ्यातील हुतात्मा कॅप्टन संतोश बाबू यांना महावीर चक्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.