ETV Bharat / state

Mumbai Corona Update: कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी यंत्रणा सज्ज, पालिकेची माहिती

जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार आटोक्यात आहे. (Mumbai Corona Update) मात्र, नवीन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढल्यास १५ दिवसात बंद केलेली १० जंबो कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वयीत करण्याते येतील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jan 5, 2023, 6:51 PM IST

Updated : Jan 10, 2023, 6:34 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरु झाला. काही दिवसात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. हॉस्पिटलमधील बेड्स कमी पडल्याने जंबो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. पालिकेने मुंबईत १० ठिकाणी कोविड सेंटर उभारली होती. यातून लाखो रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करून घरी पाठवण्यात आले. मात्र, गेल्या वर्षांपासून कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने पालिकेने एकेक करत कोविड सेंटर बंद केली. (Maharashtra Corona Update) या सेंटरमधील उपकरणे, बेड्स पालिका रुग्णालयात वापर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता.

सध्या ४४३८ बेड्स उपलब्ध - मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सध्या कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात असल्याने दिवसाला १० हुन कमी रुग्णांची नोंद होत आहे. देशात गेल्या काही दिवसात कोरोनच्या बी एफ ७ या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. सध्या पालिकेच्या रुग्णालयात ४४३८ बेड्स उपल्बध आहेत. त्यामधील केवळ ११ बेड्सवर रुग्ण आहेत. इतर सर्व बेड्स रिक्त आहेत.

१७ हजार आणखी बेड्स उपलब्ध होतील - परदेशात वाढलेला कोरोना पाहता मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. कोरोनाचे संकट उद्भवल्यास आरोग्य यंत्रणा तयार ठेवण्यासासाठी पालिकेने नियोजन केले आहे. सद्यस्थितीत २ हजार सामान्य बेड, ७७२ आयसीयू, ८५३ व्हेंटिलेटर, चार हजार डॉक्टर, साडेचार हजार नर्स आणि ४५०० आरोग्य कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. गरज लागल्यास केवळ १५ दिवसांतच १० जम्बो कोविड सेंटर सुरू करू त्यात १७ हजार बेड्स उपलब्ध केली जातील अशी माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

मुबलक ऑक्सिजन - कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत दररोज २३० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागत होती. मात्र, पालिकेने आता स्वत:ची क्षमता वाढवल्याने सद्यस्थितीत पालिकेकडे ४ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. पालिका दररोज ११५० मेट्रिक टन ऑक्सिजनची पुरवठा करू शकते, अशी क्षमता असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईत कोरोनाचे ११ लाख ५५ हजार रुग्ण - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर आतापर्यंत (४ जानेवारी) ११ लाख ५५ हजार १३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार ३६२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १९ हजार ७४६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या २७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १ लाख ७६ हजार ०८१ इतका नोंदवण्यात आलेला आहे. २८ डिसेंबर ते ३ जानेवारी या आठवड्यातील पॉजिटिव्हिटी रेट ०.०००४ टक्के इतका आहे. मुंबईमध्ये सध्या ४४३८ बेड्स असून त्यापैकी ११ म्हणजेच ०.२५ बेडवर रुग्ण दाखल आहेत.

जम्बो कोविड सेंटरची बेडसंख्या (एकूण १७ हजार ७ बेड्स)
दहिसर चेक नाका, कांदरपाडा - ७०० बेड
मालाड जम्बो कोविड सेंटर - २२०० बेड
नेस्को गोरेगाव फेज १ - २२२१ बेड
नेस्को गोरगाव फेज २ - १५०० बेड
बीकेसी कोविड सेंटर - २३२८ बेड
कांजूरमार्ग कोविड सेंटर - २००० बेड
शीव जम्बो कोविड सेंटर - १५०० बेड
आरसी भायखळा सेंटर - १००० बेड
आरसी मुलुंड जम्बो सेंटर - १७०८ बेड
सेव्हन हिल्स रुग्णालय अंधेरी - १८५० बेड

Last Updated : Jan 10, 2023, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.