मुंबई - महाराष्ट्रातील हॉस्पिटल, नर्सिंग होम या सर्व ठिकाणी फायर ऑडिट केले गेले पाहिजे. जर फायर ऑडिटमध्ये त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्याशिवाय कुठलेही खाजगी, शासकीय हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम चालवण्यासाठी परवानगी दिलेल्यांचे परवाने रद्द केले पाहिजे, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. भंडारा येथील घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही मागणी केली.
सरकारचे कडक नियम बनवण्याकडे लक्ष
भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला असून ही दुर्दैवी घटना आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यादृष्टीने सरकार कडक नियम बनविण्याकडे लक्ष देईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या लहान मुलांबाबत तीव्र दु:ख नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
निकष पूर्ण करणारे नसतील, तर त्यांचे परवाने रद्द करू - नवाब मलिक - nawab malik reaction on bhandara incident
महाराष्ट्रातील हॉस्पिटल, नर्सिंग होम या सर्व ठिकाणी फायर ऑडिट केले गेले पाहिजे. जर फायर ऑडिटमध्ये त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्याशिवाय कुठलेही खाजगी, शासकीय हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम चालवण्यासाठी परवानगी दिलेल्यांचे परवाने रद्द केले पाहिजे, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. भंडारा येथील घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही मागणी केली.