मुंबई- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असताना सत्तेचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बँकेत वळती केली, असा आरोप झाला होता. यासंदर्भात फडणवीस सरकार गेल्यानंतर लगेच नवीन सरकारने अॅक्सिस बँकेत वळवलेले खाते पुन्हा राष्ट्रीय बँकेत वळवण्यात येणार असल्याच्या बातम्या पुढे येत आहे. याबाबत जर खरंच फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केला असेल तर चौकशी होऊ द्या, असे आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
गेल्या सरकारने हे बँके खाते का वळवले. विशेष म्हणजे, फडणवीस यांची पत्नी अमृता फडवणीस या अॅक्सिस बँकेमध्ये मोठ्या हुद्यावर असल्याने बँकेला झुकते माप देत राष्ट्रीय बँकांना तोटा होणारा हा निर्णय घेण्यात आला. असे असेल तर याची चौकशी होईल, सध्या अॅक्सिस बँकेतील खाते वगळण्याबाबत असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मागच्या सरकारचे कोणतेही निर्णय नवे सरकार विनाकारण फिरवणार नाही, असे काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.