मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाल दिला. निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्ष पेटलेला असताना राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. त्याच सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने सरकारमधील 16 आमदारावर अपात्रतेची कारवाई करण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांना असल्याचे म्हटले. यामुळे सरकारमधील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या 16 आमदारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव आहे. त्यामुळे सरकार कोसळणार असल्याचा दावा विरोधी पक्षाकडून केला जात आहे. परंतु राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मात्र सरकारच्या बाजूने मत मांडत शिंदे सरकारची चिंता मिटवणारे विधान केले आहे.
288 आमदारांपैकी जर समजा 16 आमदारांचा वेगळा निकाल लागला. तर, पण वेगळा निकाल लागणार नाही. जरी तो लागला तरी सरकारच्या बहुमतावर काहीच परिणाम होत नाही. कारण 16 आमदार अपात्र झाले तर आमदारांची संख्या 272 होईल. आणि बहुमताला जी संख्या हवी आहे, तो आकडा सत्ताधाऱ्यांकडे आहे - अजित पवार, विरोधी पक्षनेते
..तरीही सरकारला काही धोका नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या १६ आमदारांचे निलंबन होणार का नाही, याविषयी राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क काढले जात आहेत. या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना माध्यम प्रतिनीधींनी प्रश्न केल्यानंतर त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिले. उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ही चर्चा आपल्या कानावरही आली आहे. 288 आमदारांपैकी जर समजा 16 आमदारांचा वेगळा निकाल लागला. तर, पण वेगळा निकाल लागणार नाही. जरी तो लागला तरी सरकारच्या बहुमतावर काहीच परिणाम होत नाही. कारण 16 आमदार अपात्र झाले तर आमदारांची संख्या 272 होईल. आणि बहुमताला जी संख्या हवी आहे, तो आकडा सत्ताधारी मंडळीकडे असल्याचे अजित पवार म्हणाले.
लवकरात लवकर कारवाई करावी : राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल आणि निवडणूक आयोगाला फटाकरले. राज्यातील सरकार हे बेकायदेशीर असल्याचा टोला देखील अप्रत्यक्ष लागावला. पण शिंदे गटाच्या 16 आमदारांविषयी सर्वोच्च न्यायालयाने कोणताच निर्णय दिला नाही. आमदार अपात्र आहे किंवा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. त्यानंतर ठाकरे गट हे अॅक्शन मोडमध्ये आले असून 16 आमदारांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी,याची मागणी करत आहे. त्याचप्रकरणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना निवेदन देखील देणार आहेत. आमदारांवर कारवाई झाली तर राज्यातील सरकार कोसळेल,अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांनी मात्र सरकारची चिंता मिटवणारे विधान केले.
सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाची मागणी : दरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पत्राद्वारे विनंती केली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि याबाबत निर्माण झालेला तिढा सोडवावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रथम सुनील प्रभू यांनी केली आहे. सुनील प्रभू हेच शिवसेनेचे योग्य प्रथोद आहेत असे नुकतेच न्यायालयाने स्पष्ट केले होते त्यानंतर सुनील प्रभू यांनी यासंदर्भात जिरवा यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केल्याने 16 आमदारांच्या अपात्रतेनंतर सत्ता बदल होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांचे सत्तेचे गणित
- भाजप आणि मित्र पक्षांची एकूण संख्या - 115
- शिंदे गटाचे आमदार - 40
- एकूण - 155
- शिंदे फडणवीस सरकारकडे संख्याबळ 165
- 165 आमदारांमधून 16 आमदार अपात्र झाले तर संख्याबळ - 149
- बहुमताचा आकडा - 145
म्हणून शिंदे सरकार पडणार नाही -- अजित पवार : दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले की, सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे मात्र असे असले तरी जरी शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तरीही शिंदे फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही. यासंदर्भात विधानसभेतील संख्याबळ पाहता अजित पवार यांच्या म्हणण्यातील तथ्य समोर येते. सध्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची एकूण संख्या पाहिली तर ती 115 आहे शिंदे गटाचे 40 आमदार त्यांना मिळाले आहेत त्यामुळे ती संख्या 155 इतकी होते. आणखी दहा अपक्ष आमदार हे युतीसोबत आले आहेत त्यामुळे सध्या शिंदे फडणवीस सरकारकडे 165 इतके संख्याबळ आहे. जर या 165 आमदारांमधून 16 आमदार अपात्र ठरले तर 149 इतके संख्याबळ शिंदे फडणवीस सरकारकडे उरते. राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी आमदारांच्या बहुमताचा आकडा हा 145 आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बहुमत जात नाही त्यामुळे 16 आमदार जरी अपात्र झाले तरी शिंदे फडणवीस सरकारला धोका नाही हे यावरून स्पष्ट होते.
पक्षातील आमदारांची संख्या
- राष्ट्रवादी काँग्रेस -53
- शिवसेना - 39
- काँग्रेस - 45
- भाजप - 105
- ठाकरे गट- 17
- अपक्ष - 13
- सपा - 2
- प्रहार जनशक्ती - 2
- इतर - 4
हेही वाचा -
- Devendra Fadnavis Reaction: महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडविण्याचे प्रयत्न सुरू, त्यांना अद्दल घडविणार- देवेंद्र फडणवीस
- ED Summons Jayant Patil: ईडीने बजावले जयंत पाटील यांना दुसरे समन्स; 29 मे रोजी होणार चौकशी
- Karnataka Election Result: कर्नाटक निकालाने देशभरात परिवर्तनाची सुरुवात - काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात