ETV Bharat / state

ICDS Commissioner Rubal Agarwal Special Interview : कोरोना रुग्णालयांचं व्यवस्थापन करणे हे जास्त आव्हानात्मक होते - रुबल अग्रवाल - रुबल अग्रवाल कोरोना कामगिरी अनुभव

सनदी अधिकारी रुबल अग्रवाल ( IAS Rubal Agrawal ) यांना प्रशासकीय सेवेतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या अरुण बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ( Rubal Agarwal Received Arun Bongirwar Award 2021 ) पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त असताना कोरोनाकाळात त्यांना बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. ( Rubal Agarwal as Additional Commisioner of Pune MNC ) अरुण बोंगिरवार पुरस्कार मिळाल्यानंतर ईटीव्ही भारतने रुबल अग्रवाल यांची विशेष मुलाखत घेतली. ( Rubal Agarwal Special Interview with ETV Bharat )

ICDS Commissioner Rubal Agarwal
एकात्मिक बालविकास सेवा विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल
author img

By

Published : Jan 20, 2022, 8:07 AM IST

हैदराबाद - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकवेळ अशी होती की, माझ्याकडे 650 कोरोना रुग्ण होते, आणि फक्त पाच तासांचा ऑक्सिजन शिल्लक होता. जोपर्यंत ऑक्सिजनचं टॅंकर येत नव्हता, तोपर्यंत मी झोपत नव्हते, खुर्चीवरदेखील बसू शकत नव्हते, कोरोना रुग्णालयाचं व्यवस्थापन करणं, मला असं वाटतं, हे सर्वात जास्त चॅलेंजिंग होतं, असे मत एकात्मिक बालविकास सेवा विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल ( ICDS Commissioner Rubal Agarwal ) यांनी व्यक्त केले आहे. सनदी अधिकारी रुबल अग्रवाल ( IAS Rubal Agrawal ) यांना प्रशासकीय सेवेतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या अरुण बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ( Rubal Agarwal Received Arun Bongirwar Award 2021 ) पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त असताना कोरोनाकाळात त्यांना बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. ( Rubal Agarwal as Additional Commisioner of Pune MNC )

ईटीव्ही भारतने एकात्मिक बालविकास सेवा विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांची घेतलेली विशेष मुलाखत

रुबल अग्रवाल या 2008 UPSC Passout आहेत. यानंतर त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले. त्यांना सेवाकाळात त्यांनी अकोला, जळगाव, शिर्डी येथेही सेवा बजावली आहे. साई संस्थानच्या पहिल्या सीईओ होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. तसेच जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांना कार्य केले. आतापर्यंत हा पुरस्कार अभिजित बांगर, डॉ. राजेंद्र भारूड यांसारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यातआला आहे. अरुण बोंगिरवार पुरस्कार मिळाल्यानंतर ईटीव्ही भारतने रुबल अग्रवाल यांची विशेष मुलाखत घेतली. ( Rubal Agarwal Special Interview with ETV Bharat )

प्रश्न - मॅम, नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही ज्या सेवेत आहात, त्या प्रशासकीय सेवेतील मानाच्या पुरस्काराने झाली. कसं वाटतंय?

उत्तर - ही माझ्यासाठी अभिनानास्पद बाब आहे. 36 प्रस्ताव होते. मात्र, त्यात सर्वांची छाननी करुन मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने माझ्या नावाची निवड केली. हा फक्त माझाच सन्मान नाही कोरोना व्यवस्थापनासाठी काम करणाऱ्या पुणे मनपाच्या 20 हजार कर्मचाऱ्यांचा हा सन्मान आहे. नवीन वर्षाच्या औचित्यावर हा सन्मान मिळत आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे आणि अरुण बोंगिरवार फाऊंडेशनला खूप धन्यवाद.

प्रश्न - कोरोनाकाळात तुम्ही पुण्याच्या अतिरिक्त असताना तुम्ही कशाप्रकारे काम केलं? सर्वात जास्त चॅलेजिंग काय होत? आणि त्याला नागरिकांनी कसा प्रतिसाद दिला?

उत्तर - 9 मार्च 2020ला होलिकादहनाच्या दिवशी मला NIV वरुन फोन आला की एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे. दोन महिन्यांपासून आमची यासंबंधीची तयारी चालू होती. रुग्णांचे आम्ही स्वॅब पाठवत होतो. मात्र, दोन महिन्यांपासून रिपोर्ट निगेटिव्ह येत होते. महाराष्ट्रात पहिला रुग्ण पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये आढळला, याबाबत आम्ही विचारही केला नव्हता. तो वेगळा अनुभव होता. आयएएसच्या प्रशिक्षणादरम्यान, पूरपरिस्थिती, आग लागणे, यांसारख्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण दिले जाते. मात्र, कोरोनाच्या महासंकटाला तोंड देण्याचं प्रशिक्षण नव्हतं. हा अनुभव पूर्णपणे नवीन होता. दररोज केंद्र सरकार, आयसीएमआर, राज्य सरकारचे नवीन नियमावली यायची. यानंतर त्याचा अभ्यास करुन त्यानुसार काम करायचे. माझ्या 12 वर्षाच्या सेवाकाळात हा सर्वात कठीण आणि चॅलेंजिंग जॉब कोरोना व्यवस्थापन होता. आता तर कोरोनाबाबत सर्वांना माहिती आहे. सोशल फिअर कमी झाले आहे. मात्र, मार्च 2020 आणि जानेवारी 2022मध्ये बराच फरक आहे. सर्वांनी सहकार्य केलं.

प्रश्न - तेव्हाची एखादी घटना, तुम्ही आमच्या प्रेक्षकासोबत शेअर कराल.

उत्तर - पुण्यातील खासगी रुग्णालयांचे जाळे फार मोठे होते. तुमचा परवाना रद्द करू, तुम्हाला दंड भरावा लागेल, याप्रकारे खासगी रुग्णालयांवर कारवाई करणे, सोपे असते. मात्र, मला त्यांच्यावर कारवाई करायची नव्हती. त्यांना सोबत घेऊन काम करायचे होते. एका खासगी रुग्णालयाला सरकारच्या नियमावलीत आणणे, काही रुग्णालये खूप मोठ्या प्रमाणात बिल आकारत होते, त्यांचे बिल कमी करुन शासनाच्या जीआरप्रमाणे लावणे, त्यांच्यासोबत व्यवस्थापन करुन काम करणे, खासगी रुग्णालयांचे 10 हजार बेड शासकीय नियमाखाली आणणे, लोकांना उपलब्ध करुन दिले, हे सर्वात जास्त चॅलेंजिंग होते. आम्ही डॉक्टर नाही तर प्रशासकीय अधिकारी आहोत. मात्र, आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून मला सर्व रुग्णालयांचं व्यवस्थापन करायचं होतं. यासोबतच सीओईपीचं जे 800 बेडचं कोविड हॉस्पिटल आहे, त्याचं व्यवस्थापन करणे तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे व्यवस्थापन करणे, एकवेळ अशी होती की, माझ्याकडे 650 कोरोना रुग्ण होते, आणि फक्त पाच तासांचा ऑक्सिजन शिल्लक होता. जोपर्यंत ऑक्सिजनचं टॅंकर येत नव्हता, तोपर्यंत मी झोपत नव्हते, खुर्चीवरदेखील बसू शकत नव्हते, कोरोना रुग्णालयाचं व्यवस्थापन करणं, मला असं वाटतं, हे सर्वात जास्त चॅलेंजिंग होतं.

प्रश्न - आतापर्यंतच्या सेवाकाळात अनेक ठिकाणी काम केलंय. शिर्डी साई संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी म्हणूनही तुम्ही सेवा बजावलीत. तिथे तुमची नियुक्ती झाल्यानंतर तिथे काय बदल झालेत?, तिथला तुमचा अनुभव कसा होता?

उत्तर - माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, जसे मोठमोठी देवस्थाने आहेत, तेथील ट्रस्टचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून माझी पहिल्यांदाच शिर्डी साई संस्थानचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे नवीन पद होतं. जळगाव जिल्हाधिकारी पदावरुन तिकडे बदली झाली. 2018मध्ये तिथे साईबाबांच्या समाधीचा शताब्दी महोत्सव होता. तो साजरा करायचा होता. त्यामुळे ते चँलेंजिंग होतं. भारताचे राष्ट्रपतींनी त्या महोत्सवाचे उद्घाटन तर समारोप पंतप्रधानांनी केला होता. समारोप करताना पंतप्रधानांनी साडे पाचशे कोटींचे मोठे प्रकल्प होते जसे की, दर्शन रांग जी मागील 15 वर्षांपासून प्रलंबित होती त्याचे भूमिपूजन, Education Complex चे भूमिपूजन, हॉस्पिटलचे नूतनीकरण यासारखे विकासप्रकल्पांचं काम याकालावधीत तिथे झालं. मागच्या आठवड्यात मी शिर्डीला गेले होते. सर्व प्रकल्प पाहून आले. त्यांचं काम पाहून आले. यासोबतच आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे, शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम त्याच कालावधीत झालं. आणि भाविकांसाठी 10 ते 12 विमानांची सुविधा त्याठिकाणी सुरू करण्यात आली.

प्रश्न - आता तुम्ही एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाच्या आयुक्त आहात. तुमच्या आताच्या कामाबद्दल, तुमच्या अनुभवाबद्दल सांगाल.

उत्तर - हा संवेदनशील विभाग आहे. 0-6 वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडी काम करते. राज्यात एक लाख दहा हजार अंगणवाडी आहेत. त्यांच्यामार्फत आपण घराघरात पोहोचलेलो आहोत. Lactating Women, Pregnant Women, 0-6 वयोगटातील मुलांचा पोषण आहार, यासाठी आपण काम करतो. त्यांचं Pre School Initiative मध्ये आम्ही आरंभ नावाची योजना सुरू केली आहे. वर्धा येथील Mahatma Gandhi Institute of Medical Science आणि युनिसेफ सोबत आम्ही काम सुरू केलं आहे. आता कोरोनाकाळात जी मुले घरी आहेत, त्यांच्यासाठी आपण आकार प्रणाली आणली आहे. त्यांच्याघरापर्यंत जाऊन आपण त्यांना प्री-स्कुल देत आहोत. मात्र, यासोबत कुपोषित बालकांचं व्यवस्थापन करणं, यात आव्हानात्मक आहे. कोरोनाकाळात त्यांची देखरेख करणे, रुग्णालयात (NRC) त्यांना दाखल करणे, कोरोनापासून त्यांना लांब ठेवणे, यासाठी आम्ही काम करत आहोत. अनेक जण आता विस्थापित होत आहेत, मेळघाटमध्ये पालघरमधून आमचे लाभार्थी विस्थापित होत आहेत. विटभट्टी कामगार, उसतोड कामगार असतील त्यांना विस्थापिताच्या या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत कोणतीही सुविधा मिळत नाही. त्यांना शासकीय सुविधांना वंचित व्हावे लागते. मात्र, आता आम्ही त्यांच्यासाठी काम करत आहोत. विस्थापित लाभार्थींना कसं कव्हर करू शकतो, यावर काम सुरू आहे.

प्रश्न - आता आपण कुपोषणासंदर्भात बोलत होतो. कुपोषण कमी करण्यासाठी तुमचा विभाग नेमका कशाप्रकार काम करत आहे?

उत्तर - कुपोषण अंतर्गत तीन विषय आहेत. पहिलं म्हणजे पालकांचं समुपदेशन. (Parents Councelling by ICDS Department ) ते म्हणजे अंगणवाडीमध्ये जे आम्ही दोन वेळचं जेवण देतो ते पुरेसं नाही. तुम्हाला घरी मुलांचं पालनपोषण कसं केलं पाहिजे, त्याच्यावर तुम्ही फोकस करा. दुसरं म्हणजे आम्ही त्यांना Addtional Meal देतो. आता आम्ही ते त्यांना घरपोच देत आहोत. मात्र, घरपोच केल्यानंतर त्यांची जबाबदारी आहे की, त्याचा वापर करणे. तिसरा म्हणजे जो सर्वात जास्त कुपोषित आहे, त्यांना काहीतरी Health Issue आहे. त्यांना फक्त जेवण पुरेसे नाही. आम्ही अभ्सास केला तर आढळले की काहींच्या हृदयात छिद्र आहे, कुणाला हार्मोनल समस्या आहे तर कुणाला आनुवांशिक आजार आहे. त्यांचा आरोग्य तपासणी केली जावी, यासाठी आम्ही काम करत आहोत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.