मुंबई - राज्य सरकारच्या प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरुच असून ९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात राज्याच्या नगर विकास २ या पदावर प्रधान सचिव म्हणून सर्वाधिक काळ नियुक्त असलेल्या मनिषा पाटणकर यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता प्रधान सचिव राज्यशिष्टाचार विभागाची जबाबदारी राहणार आहे. तर, यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून लातूर मनपा आयुक्त एम देवेंद्र सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विभागाच्या संचालिका जयश्री भोज यांची बृहन्मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्तपदी, अन्न पुरवठा प्रधान सचिव महेश पाठक यांची प्रधान सचिव नगर विकास २, साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी डीएम मुगळीकर यांची परभणी जिल्हाधिकारीपदी, डॉ. विजय सूर्यवंशी यांची कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तपदी, राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांची पशुसंवर्धन आयुक्तपदी, उपसचिव सामान्य प्रशासन विभाग येथील चंद्रकांत डांगे यांची मिरा भाईंदर मनपा आयुक्तपदी तर, परभणी जिल्हाधिकारी पी. सीवा शंकर यांची नांदेड जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - अखेर 'मुंबईच्या डबेवाल्यां'चा घरांचा प्रश्न मार्गी; 'डबेवाला भवन'ही राहणार उभे
हेही वाचा - कोरेगाव भीमा प्रकरण: ‘एनआयए’कडे तपास देण्यावरून महाविकासआघाडीत ठिणगी