मुंबई : ईडीने 21 जूनला ईडीने 15 हून अधिक ठिकाणी छापेमारी करत आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण व संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या मालमत्तांवर छापे टाकले. या छापेमारीनंतर आयएएस अधिकारी संजीय जयस्वाल यांना चौकशीसाठी समन्स बजाविले. गुरुवारी त्यांची चौकशी देखील झाली. या दरम्यान बुधवारी टाकलेल्या छापेमारीत ईडीला 150 कोटींची स्थावर मालमत्ता सापडली आहे. या 150 पैकी 100 कोटींची मालमत्ता ही आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या नावावर असल्याचा दावा आता केला जात आहे.
-
BMC Covid scam case | Searches revealed that a particular entity was supplying body bags for dead COVID-19 patients for Rs 2,000, while the said company supplied body bags for Rs 6,800 to the Central Procurement Department of BMC. The contract was given on instruction of the then…
— ANI (@ANI) June 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BMC Covid scam case | Searches revealed that a particular entity was supplying body bags for dead COVID-19 patients for Rs 2,000, while the said company supplied body bags for Rs 6,800 to the Central Procurement Department of BMC. The contract was given on instruction of the then…
— ANI (@ANI) June 23, 2023BMC Covid scam case | Searches revealed that a particular entity was supplying body bags for dead COVID-19 patients for Rs 2,000, while the said company supplied body bags for Rs 6,800 to the Central Procurement Department of BMC. The contract was given on instruction of the then…
— ANI (@ANI) June 23, 2023
ईडी लवकरच संजय जयस्वाल यांना दुसरे समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार आहे. जयस्वाल यांनी ईडीकडे चार दिवसांचा वेळ मागितला आहे. याचबरोबर ईडी लवकरच डॉ. हरिदास राठोड, रमाकांत बिरादार आणि इतरांना समन्स पाठवणार आहे. त्यांचे जबाब नोंदवणार आहे. पुढील आठवड्यात त्यांना चौकशीसाठी बोलावणार आहे. कथित कोविड सेंटर घोटाळा झाला तेव्हा जयस्वाल हे मुंबई महापालिकेत महापालिका आयुक्त होते. संजीव जयस्वाल यांनी प्रत्यक्षात फक्त 34 कोटी मालमत्ता असल्याची माहिती दिली आहे. यासोबत ही मालमत्ता त्यांच्या सासऱ्याने भेट दिल्याचे स्पष्टीकरण दिले. यासोबत 15 कोटी रूपयांच्या एफडी देखील सासऱ्याने भेट स्वरूपात दिल्याची माहिती दिल्याचा दावा केला आहे. याबाबत ईडीकडून अधिक सखोल तपास सुरू आहे.
संजीव जयस्वाल यांच्या परवानगीने कामांना मंजुरी: कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी 15 हून अधिक ठिकाणी छापांचे धाडसत्र केले होते. या छाप्यातील एक ठिकाण संजीव जयस्वाल यांचे वांद्रे पूर्व येथील घर होते. संजीव जयस्वाल हे सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष आहेत. कथित कोविड सेंटर घोटाळा झाला तेव्हा जयस्वाल हे मुंबई महापालिकेत अतिरीक्त महापालिका आयुक्त होते. त्यांच्या परवानगीने कोव्हिट सेंटरची कामे मंजुर झाल्याने त्यांची देखील चौकशी सुरू आहे.
मालमत्ता मुंबईसह इतर जिल्ह्यात: ईडीने टाकलेल्या छाप्यात पोलिसांच्या हाती महत्त्वाची 24 कागदपत्रे लागली आहे आहेत. यामध्ये 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त एफडीची कागदपत्रेही सापडल्याने ईडीच्या तपासाला अधिक वेग आला आहे. या कागदपत्रानुसार संजीव जयस्वाल यांच्याकडे 100 कोटीची मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे. या मालमत्ता जयस्वाल कुटुंबियांच्या आहेत. या मालमत्ता बहुतांशी मुंबई आणि इतर महत्त्वाच्या शहरांसह, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.
ईडीकडून मोबाईलसह महत्त्वाची उपकरणे, दागिने जप्त: बुधवारी घेतलेल्या झडतीत ईडीच्या अधिकाऱ्यांना पालिकेचे बाजारभावापेक्षा तीन टक्के अधिक दराने बॉडी बॅग 30 टक्के वाढीव दराने औषधे खरेदी केल्याची कागदपत्रे सापडली आहेत. त्याचबरोबर ईडीला दीडशे कोठे मिळून अधिक किंमत असलेल्या 50 स्थावर मालमत्तांचे कागदपत्रे, 15 कोटी हून अधिकच्या एफडी आणि 68 लाख रोख रकमेसह एक कोटी 82 लाखांचे दागिने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी असा मुद्देमाल हाती लागला असल्याची माहिती एडीच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत होणार वाढ-बीएमसी कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. एक कंपनी कोरोना रूग्णांसाठी 2,000 रुपयांना बॉडी बॅग पुरवत होती. प्रत्यक्षात त्या कंपनीने बीएमसीच्या केंद्रीय खरेदी विभागाला 6,800 रुपयांना बॉडी बॅगचा पुरवठा केला होता. बीएमसीच्या तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार हे कंत्राट देण्यात आले होते, असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-