मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर कारवाई सुरू आहे. शिवसेनेच्या नेत्यांवर सर्वाधिक धाडी पडल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर रडारवर आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या अनेक लोकांची पुराव्यानिशी प्रकरणे चव्हाट्यावर आणली आहेत. मात्र राज्यातील गृहखात्याकडून विरोधकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे शिवसेना अस्वस्थ असून हे खाते आपल्याकडे घ्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही गृह खात्याने सक्षम व्हायला हवे. आस्ते कदम भूमिका घेतल्यास स्वतःसाठी फाशीचा दोर आवळला जाईल, असे सूचक वक्तव्य केले करताना गृहखात्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस वाढल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. एक तास चाललेल्या चर्चेवेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणाले की, गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या प्रसार माध्यमातून येत आहेत. या सर्व बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या आहेत. माझ्या सहकार्यांवर माझा पूर्ण विश्वास असून ते उत्तम काम करत आहेत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहे.
-
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray dismisses reports of being upset with Home Minister Dilip Walse Patil, says I have full faith in Home Minister Patil and he is doing a good job: CMO pic.twitter.com/IbLagsYT1F
— ANI (@ANI) April 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray dismisses reports of being upset with Home Minister Dilip Walse Patil, says I have full faith in Home Minister Patil and he is doing a good job: CMO pic.twitter.com/IbLagsYT1F
— ANI (@ANI) April 1, 2022Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray dismisses reports of being upset with Home Minister Dilip Walse Patil, says I have full faith in Home Minister Patil and he is doing a good job: CMO pic.twitter.com/IbLagsYT1F
— ANI (@ANI) April 1, 2022