ETV Bharat / state

मुंबईत वाढतोय देहव्यापार; अल्पवयीन मुली, महिलांच्या मानवी तस्करीत मोठी वाढ

समाजातील सर्वच स्तरात गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत व अतिश्रीमंत यासारख्या वर्गात देहव्यापार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. देह व्यापारात मोठ्या प्रमाणावर महिला व अल्पववयीन मुलींना लोटले जात असल्याचे समोर आले आहे. या वरचा ईटीवी भारतचा स्पेशल रिपोर्ट...

मुंबईत वाढतोय देहव्यापार
मुंबईत वाढतोय देहव्यापार
author img

By

Published : Aug 20, 2020, 6:03 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सध्या देहव्यापार हा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. समाजातील सर्वच स्तरात गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत व अतिश्रीमंत यासारख्या वर्गात देहव्यापार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. देह व्यापारात मोठ्या प्रमाणावर महिला व अल्पववयीन मुलींना लोटले जात असल्याचे समोर आले आहे. या वरचा 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट...

मुंबईत वाढतोय देहव्यापार...
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालानुसार गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात महिला व अल्पवयीन मुली हरवण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायाचे झाले तर, २०१६ ते २०१८ या दोन वर्षांत देशात सर्वाधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर, २०१६ साली तब्बल २० हजार ३१६ महिला बेपत्ता झाल्या होत्या. हेच प्रमाण २०१७ मध्ये वाढत जाऊन २९ हजार २८७ झाले होते. त्यानंतर २०१८ सालात हेच प्रमाण आणखीन वाढत ३३ हजार ९६४ वर गेला. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत २०१७ साली हे प्रमाण ४ हजार ७१८ एवढे होते. २०१८ साली हेच प्रमाण ५ हजार २०१ होते.

हेही वाचा - नागपुरात अखेर लालपरी धावली, प्रवासी मात्र अनभिज्ञ

अल्पवयीन मुलींच्या हरवण्याच्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. २०१६ साली मुंबईत ४ हजार ३८८ अल्पवयीन मुली हरवल्या होती. २०१७ हेच प्रमाण २ हजार ९५६ एवढे होते. २०१८ मध्ये यात घट होत १ हजार ७११ अल्पवयीन मुली मुंबईतून बेपत्ता झाल्या आहेत.

मुंबईत एके काळी देहव्यापार मोठ्या प्रमाणात सुरू होता. मात्र बदलत्या वेळेनुसार याचे स्वरूप सुद्धा बदलले आहे. सध्याच्या घडीला व लाईन डेटिंगच्या नावाखाली, सोशल मीडिया माध्यमांवर सांकेतिक भाषेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर देहव्यापार सुरू आहे. मुंबईत व त्याच्या आजूबाजूच्या शहरात डान्स बारच्या नावाखाली देह व्यापार एकेकाळी खुलेआम सुरू होता. यात देशातील बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगालमधील महिला, तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना आणले जात होते.

हेही वाचा - National Recruitment Agency : एनआरए म्हणजे काय आणि सध्या चर्चेत का आहे?

काय आहे सांकेतिक भाषा --

समाज माध्यमांवर देह व्यापार करण्यासाठी काही सांकेतिक भाषांचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. ज्यात

लाल पाणी की मछली ( अल्पवयीन मुली )

तालाब की मछली - ( १८ ते २५ वयोगटातील तरुणी )

समुंदर की मछली - ( ३५ व त्याहून अधिक वय असलेल्या महिला )

ज्येष्ठ समाजसेविका वर्षा विद्या विलास यांच्यानुसार, समाजातील सर्वच स्तरात देह व्यापार पसरलेला असून सध्याच्या घडीला देह व्यापारात अल्पवयीन मुलींचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब आहे. अत्यंत गरीब परिस्थिती, शिक्षण असले तरी रोजगाराची संधी न मिळणे. इतर कारणांमुळे अल्पवयीन मुली यात ओढल्या जात आहेत. ह्युमन ट्रॅफिकिंगवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा, सेवाभावी संस्था ह्या कार्यरत असल्या तरी देहव्यापार हा डिजिटल पद्धतीने सुरू असल्याकारणाने यावर हवे तसे नियंत्रण आले नसल्याचे विद्या वर्षा विलास यांचे म्हणणे आहे.

मुंबई शहरात जानेवारी २०२० ते जुलै २०२० या दरम्यान देहव्यापाराच्या संदर्भात १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ३३ महिलांची देहव्यापारातून सुटका करण्यात आली. तर, ६ अल्पवयीन मुलींना देहव्यापारातून सुखरूप सोडवण्यात आले आहे. गेल्या ७ महिन्यांत मुंबईत २७ आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.