मुंबई - कोलकाता येथील एका सहाय्यक डॉक्टवर झालेल्या अमानुष हल्ल्याविरोधात आज सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने राज्यातील सरकारी व पालिका रुग्णालयातील काम बंद ठेवले. याच पार्श्वभूमीवर जीएस मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काळे कपडे परिधान करून मानवी साखळी तयार करून वेगळ्या पद्धतीने घटनेचा निषेध नोंदवला.
केईएम रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनी रक्तदान अभियान राबवले. आम्ही रुग्णांसाठी जगतो, असा संदेश या अभियानातून डॉक्टरांनी दिला. तसेच मुकनाट्य करून डॉक्टरांवरील हल्ल्याची घटना मांडली. हल्ल्यातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी सेंट्रल मार्डने केली आहे.