मुंबई Huddi film to release on 7th Sept - आनंदीचा प्रायव्हेट लिमिटेड स्टुडिओ आणि झी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड स्टुडिओ यांच्यामध्ये हड्डी चित्रपटासंदर्भात काही करार झाला होता.परंतु वाद निर्माण झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल झाला. झी कंपनीने अभिनेता नवाजुद्दीनची थकीत रक्कम कोर्टात भरावी अशी मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. तसेच हड्डी चित्रपट 7 सप्टेंबरपासून विनाडथळा प्रदर्शित होईल, असे निर्देश न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांनी दिले.
झी एंटरटेनमेंट मीडिया प्रायव्हेट लिमिटेडनं नवाजुद्दीनला 5 कोटी रुपये देणे बाकी आहे. ती रक्कम झी कंपनीने कोर्टात भरावी, अशी नवाजउद्दिनची मागणी होती. ही मागणी उच्च न्यायालयाने अमान्य केली. न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांनी मागणी फेटाळून लावली. तसेच हड्डी हा 7 सप्टेंबर 203 रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट त्याच्यावर स्थगिती देखील न्यायालयाने दिली नाही. या खटल्याची सुनावणी 4 आठवड्यानंतर होईल, असंदेखील न्यायालयाने नमूद केले. नवाजुद्दीनकडून हड्डी चित्रपट जो प्रदर्शित होतो आहे. त्याला स्थगिती देऊ नये, अशीदेखील मागणी वकिलांनी केली. वकील सुनील कुमार यांनी तसे न्यायालयात स्पष्ट केले. मात्र या प्रकरणात भविष्यात न्यायालयाने जर झी कंपनीला रकम भरण्यासाठी आदेश दिला तर त्याचे पालन करणे त्यांना भाग आहे, असे देखील वकिल सुनील कुमार यांनी युक्तीवादात म्हटलयं.
करारानुसार नवाजुद्दीननं पैशांची केली मागणी- हड्डी चित्रपटासाठी जेव्हा नवाजुद्दीन याने 2022 मध्ये करार केला. हा करार आनंदिता प्रायव्हेट स्टुडिओ सोबत केला. त्यावेळेला त्याने नमूद केलेलं होतं की या चित्रपटासाठी ठरवलेली रक्कम पाच कोटी रुपये होती. चित्रपटासाठीच्या मुख्य फोटोग्राफीकरिता देखील अतिरिक्त शुल्क लागेल. जर एक महिनापेक्षा अधिक कालावधी लागला तर त्यावेळेला अधिकच्या दिवसाचे अतिरिक्त शुल्कदेखील मोजावे लागेल. ही बाब कंपनी सोबत ठरलेली होती, असे देखील सुनील कुमार यांनी सुनावणी दरम्यान स्पष्ट केले.
काय झाला युक्तीवाद? करारामध्ये ठरल्यानंतर नवाजुद्दीनने याचिकेच्या सुनावणी दरम्यान दावा केला. चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी 32 दिवस त्याने याच कामासाठी काढून ठेवले होते. तसेच एकूण 67 दिवस असे त्याने केवळ याच करारासाठी राखीव ठेवले होते. त्यामुळेच एकूण करारानुसारच ठरल्याप्रमाणे पाच कोटी सात लाख रुपये शुल्क आहे. अतिरिक्त शुल्क कंपनीला देणे भाग आहे.हे शुल्क 32 दिवसांचे आहे. झी कंपनीकडून युक्तीवादात म्हटले की, नवाजुद्दीन यांनी जर इनव्हॉइस दिले तर बाकी असलेल्या 50 लाखापैकी 25 लाख चित्रपटाच्या आधी आणि 25 लाख चित्रपट प्रदर्शित झाल्यावर दिले जाईल. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी ZEE5 आणि OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. चार आठवड्यानंतर याची सुनावणी होईल, असे न्यायालयाने नमूद केले.
हेही वाचा-Haddi Movie : नवाजुद्दीनच्या 'हड्डी' चित्रपटात 300 ट्रान्सजेंडर दिसणार