ETV Bharat / state

अखेर बालभारतीने केली बारावीची पीडीएफमधील पुस्तके ऑनलाईन उपलब्ध

author img

By

Published : Apr 9, 2020, 9:29 AM IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना घराबाहेर निघणे शक्य होत नाही. या कालावधीत अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे.

hsc pdf books available on website of balabharati
अखेर बालभारतीने केली बारावीची पीडीएफ मधील पुस्तके ऑनलाईन उपलब्ध

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेली पुस्तक वितरणाची कोंडी फोडण्यासाठी आज बालभारतीने बारावीची सर्व पुस्तके पीडीएफ फॉरमॅटमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. बारावीची ही पीडीएफ स्वरुपातील पुस्तके http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी नुकतीच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची झुम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक घेऊन त्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या.

नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना दुकानांमधून उपलब्ध होत असतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना घराबाहेर निघणे शक्य होत नाही. या कालावधीत अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. याच बरोबर रेडीओ-टिव्हीच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत देखील पडताळणी सुरू आहे.

ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमधे मराठी. हिंदी, संस्कृत या सोबतच गणित, विज्ञान, तर्कशास्त्र. माहिती व तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. या सर्व पुस्तकांची यादी खालील प्रमाणे आहे.

युवकभारती मराठी (मराठी), संस्कृत – अल्हाद (संस्कृत),पाली-पकासो (मराठी), अर्धमागधी- प्राकृत (मराठी) , महाराष्ट्री प्राकृत (मराठी), युवकभारती – हिंदी (हिंदी), युवकभारती – बंगाली (बंगाली), युवकभारती – इंग्रजी​(इंग्रजी) युवकभारती – गुजराती (गुजराती), युवकभारती – उर्दु (उर्दु), युवकभारती – सिंधी (अरेबिक), युवकभारती – सिंधी (देवनागरी), युवकभारती- कन्नड (कन्नड) युवकभारती - तेलुगु (तेलुगु) शिक्षणशास्त्र ​(मराठी, इंग्रजी), पर्शियन – गुल्हा ए फारशी (उर्दु), अरेबिक- हिदायतुल अरेबिया (उर्दु), तर्कशास्त्र (इंग्रजी) बालविकास​(इंग्रजी), भौतिकशास्त्र (इंग्रजी), रसायनशास्त्र (इंग्रजी), जीवशास्त्र (इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (कला व विज्ञान भाग 1) (इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (कला व विज्ञान भाग 2) (इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (वाणिज्य भाग 1)​(इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (वाणिज्य भाग 2 ) (इंग्रजी), पुस्तपालन व लेखाकर्म (मराठी, इंग्रजी), सहकार (मराठी, इंग्रजी) , वाणिज्य संघटन व व्यवस्थापन​(मराठी, इंग्रजी) ,चिटणीसाची कार्यपद्धती ​(मराठी,इंग्रजी),अर्थशास्त्र (मराठी,इंग्रजी) ,जलसुरक्षा व पर्यावरण शिक्षण (मराठी , इंग्रजी) ,इतिहास (मराठी),राज्यशास्र (मराठी , इंग्रजी), माहीती तंत्रज्ञान – विज्ञान (इंग्रजी) आदी पुस्तकांचा यात समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.