ETV Bharat / state

'व्हॉट्सॲप चॅट बॉट' वरुन मुंबईकरांचे प्रश्न कसे सोडवणार? आशिष शेलारांचा सवाल

author img

By

Published : Jan 16, 2022, 3:55 PM IST

व्हॉट्सॲप चॅट बॉट वरुन मुंबईकरांचे प्रश्न कसे सोडवणार? असा प्रश्न भाजपचे नेते आशिष शेलार (Question by Ashish Shelar) यांनी विचारला आहे. त्याचबरोबर सरकारच्या या नवीन प्रणालीवर ट्विट करत सडकून टीका केली आहे.

आशिष शेलार
Ashish Shelar

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या ‘व्हॉट्सॲप चॅट बॉट’ (Inauguration of 'WhatsApp Chat Bot' by CM) सुविधेचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना विरोधकांनाही चांगलंच सुनावलं होत.‘प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज नसते’, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला होता. तोच मुद्दा हाती धरून आता भाजप नेते अशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी या व्हॉट्सॲप चॅट बॉट वर ट्विट द्वारे निशाणा साधला आहे.

मुंबईच्या मतदारांची माहिती जमा करण्यासाठी व्हॉट्सॲप चॅट बॉट -

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप चॅट बॉट (WhatsApp chat bot) नामक प्रणालीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या, खड्डयांची मोजदाद यासाठी प्रणाली आणल्या. पण त्या आकडेवारीच्या लपवाछपवी मध्ये हरवून गेलेल्या आहेत. ठेकेदार उदंड झाले आहेत. मुंबईकरांचे प्रश्न तसेच आहेत. आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्याकडे ज्यांना जाता आलं नाही, ते व्हॉट्सॲप चॅट बॉट वरून मुंबईकरांचे प्रश्न कसे सोडणार? असा प्रतिप्रश्न सुद्धा आशिष शेलार यांनी केला आहे. एकंदरीत येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका पाहता मतदारांची माहिती गोळा करण्यासाठी ही प्रणाली कार्यरत केली असल्याची टीकाही शेलार यांनी केली आहे.

  • Whatsapp ची निर्मिती 2009 ची,म्हणजे व्हॉट्सॲपला 13 वर्षे झाल्यावर आमच्या सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेला जाग आली..
    सत्ताधाऱ्यांनी "व्हाट्सअप चॅट बॉट" नामक प्रणाली वाजतगाजत आणली!
    कोरोना रुग्ण,खड्ड्यांच्या मोजदादीसाठी प्रणाली आणल्या, आकडेवारीच्या लपवाछपवीत त्या हरवून गेल्या!
    1/2

    — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे ट्विट मध्ये -

व्हॉट्सॲपची निर्मिती 2009 ची, म्हणजे व्हॉट्सॲपला 13 वर्षे झाल्यावर आमच्या सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) जाग आली. सत्ताधाऱ्यांनी "व्हाट्सअप चॅट बॉट" नामक प्रणाली वाजतगाजत आणली! कोरोना रुग्ण, खड्ड्यांच्या मोजदादीसाठी प्रणाली आणल्या, आकडेवारीच्या लपवाछपवीत त्या हरवून गेल्या! ठेके उदंड झाले, मुंबईकरांचे प्रश्न अजरामर राहिले, पालिकेने नियुक्ती न दिल्याने आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्यांकडे जे जात नाहीत ते "व्हाट्सअप चॅट बॉट" वरुन मुंबईकरांचे प्रश्न कसे सोडवणार? चला चला निवडणूक आली, मतदारांची माहिती गोळा करायला सुरुवात झाली? अशा आशयाचे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

  • ठेके उदंड झाले, मुंबईकरांचे प्रश्न अजरामर राहिले,
    पालिकेने नियुक्ती न दिल्याने आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्यांकडे जे जात नाहीत ते "व्हाट्सअप चॅट बॉट" वरुन मुंबईकरांचे प्रश्न कसे सोडवणार?

    चला चला निवडणूक आली,
    मतदारांची माहिती
    गोळा करायला सुरुवात झाली?
    2/2

काय म्हणाले होते मुख्यमंत्री -

मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे देण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना ८९९९ २२ ८९९९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर या सेवा उपलब्ध होणार आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पालिकेवर आरोप करणाऱ्यांना टोला लगावला होता. आजचा मुहूर्त चांगला आहे, पण गोड बोलण्यासाठी तिळगुळाची गरज नाही. लोकांची फक्त साधी कामं असतात. पण अनेकवेळा प्रशासनाकडून उत्तर मिळत नाही. त्यांना उत्तर मिळालं पाहिजे. त्यासाठी ही सुविधा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होत. सरकार कामाबाबात अशी कायम चर्चा असते की, तिळगुळ द्यावा लागतो, पण या कामाबाबत तसं काही झालं नाही. आता या निमित्ताने छोटी छोटी कामं पूर्ण होणार आहेत. आजचा कार्यक्रम हा क्रांतिकारक कार्यक्रम आहे .मुंबई महापालिका ही देशातील एकमेव महापालिका आहे, जिने अशाप्रकारे उपक्रम सुरु केला आहे. आमचा कारभार उघड आहे, काही लपवत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं होत. आयुक्तांना सूचना आहेत की, महापालिका नेमकी काय आहे, कसं काम करतं हे समोर आलं पाहिजे, अशा सूचना ही मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या.

हेही वाचा - Online Fraud : पिझ्झाचे पैसे परत मिळवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील एका आजीची 11 लाखांनी फसवणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.