मुंबई : परदेशात जाणे तिथे फिरणे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, आपण नेहमी विचार करतो की परदेशात जाणे खूप महाग ( Cheap foreign holidays ) आहे. नियोजन थोडे आधी केले तर ते तुमच्या बजेटमध्ये बसू शकले असते. अनेक पर्यटकांना नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात बीचवर सुट्ट्या घालवायला आवडतात. त्याशिवाय थंडी असल्याने परदेशात फिरम्याचा आनंदज सर्वच घेतात. मग अनेक जण कमी बजेटमधले परदेशी डेस्टिनेशन ( abroad Vacation ) निवडतात. त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
श्रीलंका : भारतीयांसाठी श्रीलंका सर्वोत्तम अनुकूल आहे. कारण तिथे भारतासारखेच वातावरण आहे. मात्र भूमी वेगळी आहे. सुंदर समुद्रकिनारा आणि स्वस्त हॉटेल्स यामुळे श्रीलंका तुमच्या खिशाला फार जड जाणार ( Sri Lanka Tourism cost ) नाही. या प्रदेशातील लोक एअरविस्टा, एअरइंडिया किंवा लक्झरी श्रीलंकन एअरलाइन्सची फ्लाइट थेट दिल्लीहून इतर एअरलाइन्सपेक्षा कमी दरात बुक करू शकतात. तुम्ही मुंबईहून फ्लाइट घेतल्यास, श्रीलंकेला परतीचे फ्लाइट 12000 ते 15000 प्रति व्यक्ती आहे. श्रीलंकन एअरलाइन्सकडून ही सोय देण्यात आली आहे. या एअरलाईन्सचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्हाला उत्तम आसनव्यवस्था, भारतीय खाद्यपदार्थ आणि कमी खर्चात लक्झरी प्रवासाची अनुभूती देते. त्याचप्रमाणे, तीन आणि चार तारांकित हॉटेलसाठी, तुम्हाला एका रात्रीसाठी 2000 ते 3000 हजार रुपये खर्च करावे लागू शकतात. कोलंबो विमानतळ एक लहान पण सुसज्ज विमानतळ आहे. येथून जगातील बहुतेक देशांसाठी थेट किंवा कनेक्टिंग फ्लाइट आहे. हे भारतातील अनेक शहरांशी हवाई सेवेने जोडलेले आहे. या देशाला भेट देण्यासाठी, तुम्हाला दोन दिवसांचा ऑन अरायव्हल ट्रान्झिट व्हिसा मोफत मिळतो, तर 30 दिवसांच्या पर्यटक व्हिसाची किंमत 20 डॉलर आहे. टुरिस्ट व्हिसासाठी, फक्त ईटीए ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. विशेष म्हणजे, 1972 पर्यंत श्रीलंकेचे नाव सिलोन होते. जे 1972 मध्ये लंका आणि 1978 मध्ये श्रीलंका असे करण्यात आले. रामायण काळातील अनेक ऐतिहासिक स्थळे येथे पाहायला मिळतात. बेंटोटा बीच हे इथले सर्वात सुंदर बीच आहे.
मालदीव : मालदीवला भेट देणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे हनिमून डेस्टिनेशन आहे. त्याशिवाय सर्व बॉलिवूड कलाकार, मोठे व्यवसायीक, इथेच त्यांच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येतात. समुद्रकिनाऱ्याचे सुंदर आणि स्वच्छ निळे पाणी कौटुंबिक सुट्टीसाठी भारतीयांची पहिली पसंती बनत आहे. श्रीलंका मार्गे आणि दिल्लीहून थेट उड्डाणे उपलब्ध आहेत. श्रीलंकेमार्गे मालदीवला जाण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला दोन दिवसांचा श्रीलंका ट्रान्झिट व्हिसा मोफत मिळतो त्याशिवाय श्रीलंका एअरवेज आणि विस्तारा एअरवेजकडून स्वस्त तिकीटही ( Maldives Tourism cost ) मिळते. दिल्लीहून श्रीलंका मार्गे जाण्यासाठी 17 ते 20 हजार आकारावे लागतात. तर मुंबईहून 15 ते 17 हजारांमध्ये तीन तासांपेक्षा कमी वेळेत पोहोचता येते. इथे भारतीयांना ना व्हिसा घ्यावा लागतो ना त्यासाठी कोणतीही रक्कम द्यावी लागते. फक्त पासपोर्ट च्या आधारावर जाऊ शकतो.