ETV Bharat / state

Police housing project : राज्यातील पोलिसांसाठी ५३ हजार घरांची लवकरच बांधणी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा - राज्याच्या पोलिसांचा गृहप्रकल्प पूर्ण होणार

राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या मनात असलेला सरकार विषयी असंतोष आणि शासनामध्ये असलेली चलबल चलविचल तसेच तीन उद्योग प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्याच्या या पार्श्वभूमीवरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी आज अनेक प्रकल्पांना विविध अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेत मंजुरी दिलेली आहे. यावेळी राज्याच्या पोलिसांचा गृहप्रकल्प प्रगतीपथावर असून लवकरच 53,860 घरांची बांधणी होणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.

Police housing project
राज्याच्या पोलिसांचा गृहप्रकल्प प्रगतीपथावर
author img

By

Published : Nov 1, 2022, 9:18 PM IST

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या मनात असलेला सरकार विषयी असंतोष आणि शासनामध्ये असलेली चलबल चलविचल तसेच तीन उद्योग प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्याच्या या पार्श्वभूमीवरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी आज अनेक प्रकल्पांना विविध अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेत मंजुरी दिलेली आहे. यावेळी राज्याच्या पोलिसांचा गृहप्रकल्प प्रगतीपथावर असून लवकरच 53,860 घरांची बांधणी होणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.

राज्यभरात 457 पोलिसांच्या निवासस्थानाचे प्रकल्प सुरू - राज्यातील पोलिसांच्या घराचा प्रश्न मोठा बिकट आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पोलीस कर्मचारी ज्या शासकीय निवासस्थानी राहतात, त्यापैकी बहुतांश जुने झालेले आहेत आणि अत्यंत जीर्ण अवस्थेमध्ये इमारती आहेत. तसेच हजारो पोलिसांना शासनाचे निवासस्थान नाही. त्यामुळे या पोलिसांना भाड्याच्या घरात राहावे लागते. या पाश्वभूमीवर महाराष्ट्र राज्यभरात 457 पोलिसांच्या निवासस्थानाचे प्रकल्प सुरू करण्यात येत असून या प्रकल्पामधून 53860 पोलिसांना निवासस्थान मिळणार आहे. पोलीसांच्या शासकीय निवासस्थानाबाबत बाबत विविध विभागाच्या संयुक्त बैठकी घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ठोस निर्णय जाहीर केला आहे.

महाराष्ट्रात नवीन 87 पोलीस स्टेशन उभारण्यात येणार - राज्यामध्ये पोलीस ठाणे व पोलिसांचे निवासस्थान याबाबतचे पंधरा प्रकल्प आता तयार होत आलेले आहेत. अजून दहा प्रकल्प पुढील सहा महिन्यांमध्ये हे शासन पूर्ण करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी या आढावा बैठकीदरम्यान सांगितले. तसेच महाराष्ट्रात नवीन 87 पोलीस स्टेशन उभारण्यात येतील आणि त्यापैकी सात पोलीस स्टेशन हे मुंबईच्या हद्दीमध्ये असतील अशी नवीन घोषणा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

घोषणा सार्थ ठरली - या संदर्भात मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलेले आहे की," गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या गृहप्रकल्पाची घोषणा ऐकत आहोत, ही घोषणा खरोखर सार्थ ठरली तर नक्कीच पोलिसांना चांगले शासकीय निवासस्थान मिळू शकेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.