ETV Bharat / state

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होणार - गृहमंत्री - साकीनाका बलात्कार आरोपी मोहन चौहान

'साकीनाका येथील बलात्कार पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा केली जाईलच. पण यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध घ्यायला पोलिसांना सांगितले आहे', असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

गृहमंत्री
गृहमंत्री
author img

By

Published : Sep 11, 2021, 11:29 AM IST

Updated : Sep 11, 2021, 12:26 PM IST

मुंबई : 'साकीनाका येथे 32 वर्षीय महिलेवर अमानुष्य कृत्य करण्यात आले. पीडिता उपचार घेत आहे. तिचा जबाब झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. पोलीस खात्याला सूचना दिल्या आहेत, की या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहेत का ते शोधा म्हणून. वेळोवेळी मी या प्रकरणाची सर्व माहिती घेत आहे', असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नक्की काय आहे प्रकरण?

साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खैरानी रोड येथे रात्री तीनच्या दरम्यान एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार पोलीस कंट्रोलला मिळाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी टाकण्यात आल्याने ती गंभीररीत्या जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे, असा अहवाल यावेळी डॉक्टरांनी पोलिसांना दिला.

एका आरोपीला अटक

या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त महेश्वरी रेड्डी यांनी दिली.

मुंबईत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती

राजधानी दिल्लीत आठ वर्षांपूर्वी चालत्या बसमध्ये बलात्काराची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. निर्भया असे या पीडितेला नाव देण्यात आले आणि महिला सुरक्षेची चळवळ संपूर्ण देशात ऊभी राहिली. यानंतर दिल्लीसह देशभरात आंदोलने झाले. आरोपींना अखेर फाशीची शिक्षा देण्यात आली.

काय आहे निर्भया प्रकरण?

दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली निर्भया ही रात्री तिच्या मित्रासोबत सिनेमा पाहून घरी परतत होती. नवी दिल्ली येथील मुनीरकापासून द्वारका या ठिकाणी जाण्यासाठी या दोघांनी बस पकडली. या बसमध्ये बसल्यावर फक्त पाच ते सात प्रवासी असल्याचं या दोघांना लक्षात आलं. प्रवास सुरु झाल्यानंतर बसलेल्या इतरांनी निर्भयासोबत छेडछाड केली. यामध्ये तिच्या मित्राने हस्तक्षेप केला तेव्हा त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहारण करण्यात आली. यानंतर सहा आरोपींनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर तिचा अमानुषपणे लैंगिक छळही केला. यानंतर विविस्त्र अवस्थेत निर्भया आणि तिच्या मित्राला बसबाहेर फेकून देण्यात आलं.

या सगळ्या प्रकारानंतर निर्भयाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिला पुढील उपचारांसाठी सिंगापूरलाही नेण्यात आलं. मात्र तिथेच २९ डिसेंबर २०१२ ला तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात २०१३ मध्ये आत्महत्या केली. ऑगस्ट २०१३ मध्ये अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. सप्टेंबर २०१३ मध्ये चार मुख्य आरोपींना १३ अपराधांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाने दोषी ठरवलं. १३ सप्टेंबर २०१३ रोजी या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

हेही वाचा - फुटबॉल मैदानात वीज पडल्याने दोन तरुणांचा मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी

Last Updated : Sep 11, 2021, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.