ETV Bharat / state

Himalaya Bridge मुंबई महापालिकेने हिमालय पुलाचे पाचही गर्डर विक्रमी वेळेत बसवले, मार्चपर्यत पूल नागरिकांसाठी खुला - हिमालय पुलाचे पाचही गर्डर

हिमालय पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर मुंबई महापालिकेने शहरातील सगळ्याच पुलांचे ऑडीट केले होते. त्यानंतर हिमालय पुलावर ( Himalaya Bridge Girder Work Mumbai ) लोखंडी गर्डर न बसवता स्टिलचे गर्डर ( Girder Work Completed In Record Break Time ) बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र हे गर्डर बसवण्यासाठी महापालिकेला चार दिवस रात्रीची वाहतूक बंद ठेवून काम करण्याची परवानगी मिळाली होती. महापालिकेने ( Himalaya Bridge Girder Work Completed In Record Break Time ) दोनच दिवसात हे गर्डर बसवण्याचे काम केले आहे. त्यामुळे विक्रमी वेळेत हे काम करण्यात आले.

Himalaya Bridge Girder Work Completed
हिमालय पुलाचे पाचही गर्डर विक्रमी वेळेत बसवले
author img

By

Published : Jan 9, 2023, 3:50 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai ) येथील हिमालय पूल ( Himalaya Bridge Mumbai ) मार्च २०१९ मध्ये कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला होता. या पुलाचे काम सुरू असून नव्या वर्षात हा पूल पुन्हा खुला केला जाणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी लागणारे ५ पैकी ३ गर्डर शनिवारी तर २ गर्डर रविवारी बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेला ४ दिवसांची परवानगी ( BMC Set Up Girder On Himalaya Bridge ) मिळाली होती, त्यापैकी २ दिवसात हे गर्डर ( Himalaya Bridge Work Complate In Record Break Time ) विक्रमी वेळेत बसवण्यात आले आहेत. आता पुलाचे इतर काम, तसेच पायऱ्यांचे काम करून मार्चपर्यंत हा पूल नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे.

हिमालय पूल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून टाईम्स ऑफ इंडिया, मुंबई पोलीस मुख्यालय ( Mumbai Police Headquarters ) , अंजुमन इस्लाम कॉलेज, किल्ला कोर्ट, आझाद मैदान पोलीस स्टेशन याकडे ये जा करण्यासाठी रेल्वे प्रवासी हिमालय पुलाचा वापर करत होते. १४ मार्च २०१९ रोजी हिमालय पुलाचा मोठा भाग ( Himalaya Bridge Colapse In Mumbai )कोसळला होता. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू तर ३२ जण जखमी झाले होते. अंधेरी येथील गोखले पूल कोसळल्यावर हिमालय पूल कोसळला होता. यामुळे महापालिकेने मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. या ऑडिटनंतर महापालिकेने बहुतेक धोकादायक पूल पाडले आहेत. तर काहींच्या कामासाठी निधीची तरतूद केली आहे.

विक्रमी वेळेत पुलाचे गर्डर बसवले - मुंबई शहर समुद्र किनारी असल्याने लोखंडी गर्डर बसवू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. या अनुषंगाने महापालिकेने गर्डर स्टेनलेसस्टीलचे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हिमालय पुलाचे पिलर उभे राहिले. त्यावर बसवण्यासाठी १२० टन वजनाचे ५ गर्डर आणण्यात आले होते. हे गर्डर बसवण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबरमध्ये वाहतूक बंद करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र ती परवानगी मिळाली नव्हती. शनिवार रविवार धरून ७, ८, १४ आणि १५ जानेवारी असे चार दिवस रात्रीची वाहतूक बंद करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. शुक्रवारी ६ जानेवारीला सर्व तयारी करण्यात आली होती. शनिवारी ७ जानेवारीला रात्री ११ ते रविवारी पहाटे ५ वाजेपर्यंत ३ गर्डर तर रविवारी रात्री ८ जानेवारीला रात्री ११ ते पहाटे ३. ३० पर्यंत २ गर्डर बसवण्यात आले. चार दिवसांची परवानगी असताना दोनच दिवसात गर्डर बसवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पूल विभागाने दिली.

असे झाले काम - हिमालय पुलाच्या एका बाजूला टाइम्स ऑफ इंडिया तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत आहे. त्यामधील रस्त्यावर क्रेनद्वारे हे गर्डर बसवण्यात आले. शनिवारी रात्री ३ गर्डर बसवताना दोन इमारतीच्या मध्ये कशा प्रक्रारे काम करावे, क्रेनचा वापर कसा करावा, याचा अनुभव असल्याने रविवारी कमी वेळेत दोन गर्डर बसवण्याचे काम सोपे झाले. आता पुलाची इतर कामे तसेच शिड्यांचे बांधकाम करून येत्या मार्चपर्यंत हा पूल नागरिक आणि प्रवाशांसाठी खुला केला जणार आहे. तर एक्सलेटर बसवण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती महापालिकेच्या पूल विभागाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.