ETV Bharat / state

नक्षली कनेक्शन प्रकरण : गौतम नवलखा यांच्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला राखून

शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलाखा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात  गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. दाखल याचिकेवर आज गौतम नवलखा यांनी युक्तिवाद पूर्ण केल्यावर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला आहे.

गौतम नवलखा
author img

By

Published : Jul 26, 2019, 1:23 PM IST

मुंबई- शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलाखा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. दाखल याचिकेवर आज गौतम नवलखा यांनी युक्तिवाद पूर्ण केल्यावर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला आहे.

शुक्रवारच्या सुनावणीत गौतम नवलखायांचे वकील युग चौधरी यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, माओवाद्यांनी गौतम नवलखाना पत्र पाठवणे म्हणजे गुन्हा ठरत नाही. गौतम नावलखा यांनी माओवादी, भारत पाकिस्तान व समाजातील इतर प्रश्नावर अनेक पुस्तक लिहिले आहेत. गौतम नवलखा हे शांती प्रिय समाजसेवक आहेत. त्यांनी गणपती सारख्या मोठ्या माओवाद्याची मुलाखत घेतली. त्यासाठी ते 2 आठवडे जंगलात होते. त्यावेळी विदेशी पत्रकार सुद्धा होते. माओवाद्यांनी त्यांच्या काही लेखांचा निषेध केला आहे.

अशी व्यक्ती सरकार व माओवाद्यांकडून टार्गेट केली जाऊ शकते. गौतम नावलखा यांनी माओवाद्यनावर सुद्धा टीका केली आहे. पीपल्स लिब्रेशन गोरिला आर्मी सारख्या नक्षली गटाकडून झालेल्या नासंहारावर सुद्धा गौतम नवलखा यांनी टीकात्मक लेख लिहिले आहेत. एड युग चौधरी यांनी कोर्टात इकॉनॉमिक पोलिटिकल विकली मधील काश्मीर हिंसेवर गौतम नावलखा यांच्या लेखाचा दाखला दिला.

65 वर्षीय गौतम नवलखा एक शांतता प्रिय कार्यकर्ता असून 35 वर्षे चळवळीत काम करूनही आज पर्यंत एकही गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल नसताना, राज्याच्या एटीएस कडून कारवाई होत नाही. झारखंड, छत्तीसगढ सारख्या पोलिसांकडूनही अद्याप कारवाई नाही? मग पुणे पोलीस का कारवाई करीत आहेत? असा सवाल आज कोर्टात युग चौधरी यांनी केला.

दरम्यान शहरी नक्षलवाद प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या गौतम नवलखा व त्यांच्या नक्षली सहकाऱ्यांची संबंध हिजबुल मुजाहिद्दीन व काश्मिरी नेत्यांसोबत असल्याचे पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारच्या सुनावणीत म्हटले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रणजित मोरे व भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पुणे पोलिसांचे वकील अरुणा पै यांनी कोर्टात बाजू मांडताना म्हटले की रोना विल्सन व सुरेंद्र गडलिंग यांच्याकडून मिळालेल्या लॅपटॉपचा तपास केला असता त्यात गौतम नावलखा व इतर नक्षली गटांचे हिजबुल मुजाहुद्दीनच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू होती. गौतम नावलखा हे 2011 ते 2014 पर्यंत काश्मिरी नेते सैयद अली शहा गिलानी व शकील बक्षी यांच्याही संपर्कात असल्याचा दावा पुणे पोलिसांनी कोर्टात केला आहे.

Intro:शहरी नक्षलवाद प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या गौतम नवलाखा यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज गौतम नवलखा यांनी युक्तिवाद पूर्ण केल्यावर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला आहे.
Body:शुक्रवारच्या सुनावणीत गौतम नवलखा यांचे वकील युग चौधरी यांनी युक्तिवाद करताना म्हटले की माओवाद्यांनी गौतम नवलखाना पत्र पाठवणे म्हणजे गुन्हा ठरत नाही , गौतम नावलखा यांनी माओवादी , भारत पाकिस्तान व समाजातील इतर प्रश्नावर अनेक पुस्तक लिहिले आहेत. गौतम नवलखा हे शांती प्रिय समाजसेवक आहेत, त्यांनी गणपती सारख्या मोठ्या माओवाद्याची मुलाखत घेतली त्यासाठी ते 2 आठवडे जंगलात होते . त्यावेळी विदेशी पत्रकार सुद्धा होते.माओवाद्यांनी त्यांच्या काही लेखांचा निषेध केला आहे.

अशी व्यक्ती सरकार व माओवाद्यांकडून टार्गेट केली जाऊ शकते. गौतम नावलखा यांनी माओवाद्यनावर सुद्धा टीका केली आहे. पीपल्स लिब्रेशन गोरिला आर्मी सारख्या नक्षली गटाकडून झालेल्या नासंहारावर सुद्धा गौतम नवलखा यांनी टीकात्मक लेख लिहिले आहेत. एड युग चौधरी यांनी कोर्टात इकॉनॉमिक पोलिटिकल विकली मधील काश्मीर हिंसेवर गौतम नावलखा यांच्या लेखाचा दाखला दिला.

65 वर्षीय गौतम नवलखा एक शांतता प्रिय कार्यकर्ता असून 35 वर्षे चळवळीत काम करूनही आज पर्यंत एकही गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल नसताना , राज्याच्या एटीएस कडून कारवाई होत नाही. झारखंड , छत्तीसगढ सारख्या पोलिसांकडूनही अद्याप कारवाई नाही? मग पुणे पोलीस का कारवाई करीत आहेत? असा सवाल आज कोर्टात युग चौधरी यांनी केला. Conclusion:दरम्यान शहरी नक्षलवाद प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या गौतम नवलखा व त्यांच्या नक्षली सहकाऱ्यांची संबंध हिजबुल मुजाहिद्दीन व काश्मिरी नेत्यांसोबत असल्याचे पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारच्या सुनावणीत म्हटले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रणजित मोरे व भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पुणे पोलिसांचे वकील अरुणा पै यांनी कोर्टात बाजू मांडताना म्हटले की रोना विल्सन व सुरेंद्र गडलिंग यांच्याकडून मिळालेल्या लॅपटॉप चा तपास केला असता त्यात गौतम नावलखा व इतर नक्षली गटांचे हिजबुल मुजाहुद्दीन च्या नेत्यांसोबत चर्चा सुरू होती. गौतम नावलखा हे 2011 ते 2014 पर्यंत काश्मिरी नेते सैयद अली शहा गिलानी व शकील बक्षी यांच्याही संपर्कात असल्याचा दावा पुणे पोलिसांनी कोर्टात केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.