ETV Bharat / state

पालिकेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच; उच्च न्यायालयाने भाजपाचा दावा फेटाळला

author img

By

Published : Sep 21, 2020, 2:23 PM IST

Updated : Sep 21, 2020, 7:34 PM IST

भाजपाने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला होता. त्यावर महापौरांनी, पालिकेच्या नियमाप्रमाणे भाजपाला हे पद देता येत नसल्याचा निकाल दिला. आता न्यायालयाने देखील त्यावर शिक्कामोर्तब केल्याने काँग्रेसकडेच विरोधी पक्षनेते पद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मनपा
मनपा

मुंबई - मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या सत्ताकाळात आधी मित्रपक्ष असलेल्या भाजपाने राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यावर पालिकेत विरोधकांची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते पदावर दावा करत, भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पालिकेच्या नियमाप्रमाणे काँग्रेसला देण्यात आलेले विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच राहणार की, भाजपाकडे जाणार याबाबतचा निकाल आज लागला आहे. न्यायालयाने भाजपाचा दावा फेटाळत काँग्रेसकडेच विरोधी पक्ष नेते पद राहणार असल्याचा निर्णय दिला आहे.

काँग्रेसकडेच विरोधी पक्षनेते पद राहणार...

2014मध्ये विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेने पालिकेची 2017ची निवडणूक देखील वेगवेगळी लढवली. शिवसेनेचे 84 तर, भाजपाचे 82 नगरसेवक निवडून आले. महापौरपदासाठी शिवसेनेने उमेदवार उभा केला असता भाजपाने त्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्याचवेळी आम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाही, कोणत्याही पदावर दावा करणार नाही, पहारेकऱ्याची भूमिका पार पाडू, असे भाजपाकडून जाहीर करण्यात आले होते.

महापौरपद शिवसेनेकडेच राहावे, म्हणून बहुमतासाठी सेनेने अपक्ष नगरसेवकांना सोबत घेतले, तसेच मनसे 6 नगरसेवक फोडून आपल्या पक्षात प्रवेश दिला. महापौरपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देताना भाजपाने कोणत्याही पदावर दावा करणार नसल्याचे जाहीर केल्याने विरोधी पक्षनेते पद तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसकडे देण्यात आले. विरोधी पक्षनेतेपदी रवी राजा यांची 2017मध्ये निवड करण्यात आली. राज्यात मागील वर्षी विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी पुन्हा एकत्र आलेल्या भाजपा आणि शिवसेनेने सत्तासंघर्षात एकमेकांशी फारकत घेतली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर पालिकेत भाजपाने विरोधात बसण्याचे जाहीर केले.

भाजपाने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला होता. त्यावर महापौरांनी, पालिकेच्या नियमाप्रमाणे भाजपाला हे पद देता येत नसल्याचा निकाल दिला. या निकालाला भाजपाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाचा निकाल आज न्यायालयाने दिला आहे. भाजपाचा विरोधी पक्षनेते पदाचा दावा फेटाळण्यात आला आहे. यामुळे काँग्रेकडेच विरोधी पक्षनेते पद राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.

पालिकेचा नियम काय - पालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाने विरोधी पक्षनेते पद घेण्यास नकार दिला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाच्या काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद देण्यात आले. एखाद्याला हे पद दिले असता त्या पदावरील व्यक्ती राजीनामा देत नाही, त्या पदावरील दावा सोडत नाही किंवा त्याचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत त्या पदावर दुसरा विरोधी पक्षनेता निवडता येत नाही. सध्या काँग्रेसचे रवी राजा विरोधी पक्षनेते आहेत. त्या पदावर भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दावा केला होता.

Last Updated : Sep 21, 2020, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.