ETV Bharat / state

Anushka Sharma Petition : अनुष्का शर्माचे कारवाईला आव्हान, कोर्टाची आयकर विभागालाच नोटीस

अभिनेत्री अनुष्का शर्माने विक्रीकर विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने विक्रीकर विभागाला याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. या याचिकेवर 6 फेब्रुवारीला आता सुनावणी होणार आहे.

Anushka Sharma Petition
अनुष्का शर्मा
author img

By

Published : Jan 12, 2023, 3:54 PM IST

मुंबई -भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने 2012-13 आणि 2013-14 ची थकबाकी वसूल करण्यासाठी विक्रीकर विभागाने जारी केलेल्या नोटीसविरोधात ही याचिका दाखल केली आहे. दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटीसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे. या याचिकांवर गुरूवारी न्यायमूर्ती नितीन जामदार, न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या याचिकेवर विक्रीकर विभागाला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी 6 फेब्रुवारी घेण्याचं निश्चित केलं आहे.

याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप - अनुष्कानं यापूर्वी याच मुद्यावर आपल्या कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली होती. मात्र अनुष्का यावर स्वतः याचिका का दाखल करत नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. एखाद्या व्यक्तीनं कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली असं आतापर्यंत कधीही घडलेलं नाही असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर ती याचिका मागे घेऊन पुन्हा नव्यानं याचिका दाखल करण्याची मुभा देत याचिका निकाली काढली होती.

काय आहे प्रकरण - अभिनेत्री अनुष्का शर्माला विक्रीकर विभागानं नोटीस बजावली आहे. अनुष्कानं एका पुरस्कार सोहळ्यात केलेलं सादरीकरणामुळे व्यावसायिकरित्या तिच्या उत्पादनांची जाहिरातबाजी झाली आहे, असा ठपका विक्रीकर विभागानं ठेवला आहे. यासंबंधी साल 2012-13 साठी 12.3 कोटींच्या उत्पनावर 1.2 कोटी तर, साल 2013-14 साठी 17 कोटींच्या उत्पनावर 1.6 कोटी रुपये कर थकबाकी दाखवली आहे. ही थकबाकी वसूल करण्याची नोटीस विक्रीकर उपायुक्तांनी पाठवली आहे. या नोटीसीला अनुष्कानं हायकोर्टात आव्हान दिलं आहे.

सरकारचा याचिकेला विरोध - याप्रकरणी अनुष्कापुढे अपिलीय लवादापुढे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचा दावा करत राज्य सरकारनं या याचिकेला विरोध केला होता. मात्र, जर आम्ही ते अपील केलं तर, आम्हाला त्यापूर्वी करातील 10 टक्के रक्कम जमा करावी लागेल असा, दावा अनुष्काच्यावतीनं करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.