ETV Bharat / state

Malik in Supreme Court : उच्च न्यायालयात तारीख पे तारीख, माजी मंत्री नबाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्जावर सुनावणी न घेतल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री नबाब मलिक यांनी अखेर सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. (Malik in Supreme Court)

Nawab Malik in Supreme Court
नबाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव
author img

By

Published : Aug 4, 2023, 1:13 PM IST

Updated : Aug 4, 2023, 1:24 PM IST

मुंबई : नवाब मलिक यांनी विशेष रजा याचिकेचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज केला होता. तो फेटाळल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. विशेष रजा याचिका स्पेशल लिव्ह पिटीशन अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. सोमवारी त्यावर सुनावणी होणार आहे.

नवाब मलिक यांच्यावर कुख्यात दहशतवादी, अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी कुर्ला येथील जमीन खरेदीत देखील बेकायदेशीर व्यवहार केल्याचा आरोप ईडीने ठेवलेला आहे. अनेक महिने ते त्या आरोपात तुरुंगात आहेत. परंतु त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्यामुळे वैद्यकीय कारणास्तव ते खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.

याच वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्या एक सदस्य खंडपीठापुढे अनेकदा सुनावणी झाली. परंतु त्यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला. म्हणून आता विशेष रजा याचिका आधारे सर्वोच्च न्यायालयात नवाब मलिक यांनी धाव घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेतली आहे. ईडीकडून वैद्यकीय अहवाल कोणता, कुठे आहे? अशी विचारणा मागील सुनावणी मध्ये मुंबई उच्च न्यायालयात केली गेली होती.

त्यावेळेला वैद्यकीय अहवाल आणि त्याची सगळी कागदपत्रे उच्च न्यायालयात सादर केली गेली होती. त्यावेळी नवाब मलिक यांच्या वतीने जोरदार मागणी केली गेली होती की एक किडनी 100 टक्के खराब झाली तर दुसरी किडनी 85 टक्के खराब झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय आधारावर जामीन मिळायला हवा. जामीन हा मूलभूत अधिकारांतर्गत दिला गेलेला अधिकार आहे.

मलिक यांनी दावा केला आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गुणवत्तेच्या आधारे जामीन अर्जावर पूर्णतः सुनावणी घेतलीच नाही. त्यामुळेच विशेष रजा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या याचिकेमध्ये त्यांनी मुद्दा अधोरेखित केलेला आहे की, ईडीने आरोप ठेवला आरोप ठेवल्यानंतर अटक केली. पण त्याच्याही आधी माझी शारीरिक स्थिती कमजोरीची होती.

किडन्या खराब झालेल्या होत्या. त्याबाबत मी उपचार घेत होतो. ही सर्व वैद्यकीय कागदपत्रे उच्च न्यायालयासमोर ठेवली होती. परंतु जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. म्हणूनच सर्वोच्च न्यायालय हाच एकमेव आधार आहे. त्यासाठी विशेष रजा याचिका अंतर्गत ही याचिका दाखल केलेली आहे. यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे.

Last Updated : Aug 4, 2023, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.