ETV Bharat / state

जगातील सर्वात जुन्या गणेशमूर्तीची चित्रलिपी पाहण्याची मुंबईकरांना संधी

ही चित्रलिपी पहिल्या शतकातील असून ती गुजरात येथील डॉ. प्रकाश कोठारी यांनी संग्रहित करून ठेवली आहे. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत जगातील सर्वात जुन्या या गणेशमूर्ती शिल्पांचे प्रदर्शन सुरू आहे.

जगातील सर्वात जुन्या गणेशमूर्तीची चित्रलिपी पाहण्याची मुंबईकरांना संधी
author img

By

Published : Aug 30, 2019, 6:55 PM IST

Updated : Aug 30, 2019, 11:32 PM IST

मुंबई - जगातील सर्वात प्राचीन आणि पहिल्या शतकातील सर्वात जुन्या गणेश मूर्तीची चित्रलिपी जवळून पाहण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. ही चित्रलिपी पहिल्या शतकातील असून ती गुजरात येथील डॉ. प्रकाश कोठारी यांनी संग्रहित करून ठेवली आहे. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत जगातील सर्वात जुन्या या गणेशमूर्ती शिल्पांचे प्रदर्शन सुरू आहे.

जगातील सर्वात जुन्या गणेशमूर्तीची चित्रलिपी पाहण्याची मुंबईकरांना संधी

डॉ. कोठारी याबाबत म्हणाले, "या गणेशमूर्तीचे चित्रशिल्प बारा वर्षांपूर्वी मला मुंबईच्या चोर बाजारात मिळाले होते. मला तेव्हा हे इतके प्राचीन असेल असे वाटले नव्हते. नंतर मला त्यावर ब्राम्ही लिपीत काही तरी लिहिल्याचे लक्षात आल्यानंतर मी पुरातत्व खात्याला आणि त्यासाठीचे संशोधन करणाऱ्या मित्रांना ते पाठवले. म्हैसूर आणि इतर ठिकाणच्या संशोधन संस्थांनी हे शिल्प चीनमध्ये असलेल्या सर्वात जुन्या गणेश शिल्पापेक्षा जुने असल्याचे सांगितले. मी देशात अनेक ठिकाणी फिरताना मला पहिल्या ते विसाव्या शतकापर्यंत अनेक गणेशशिल्प मिळाले. या प्रदर्शनात विसाव्या शतकापर्यंतचे 60 शिल्प ठेवण्यात आले आहेत"

त्यांच्याकडे पेशवाचे काळातील श्री गणपती पंतप्रधान, मराठा नाणे ठेवले असून सव्वा चार लाख रुपयांना त्यांनी ते विकत घेतले होते. त्यासोबत अठराव्या शतकातील कोकशास्त्र, तामिळनाडू कार्तिकेय तामिळनाडू येथील लाकडावर कोरण्यात आलेली अठराव्या शतकातील कावड त्यांनी नेपाल येथून मिळवले आहे. त्यांच्याकडे महाबळीपुरम यांची प्रतिकृती असलेले शिवलिंग असून त्यात संपूर्ण शिव,पार्वती, गणेश हे शिव कुटुंब आहे. अनेक शिल्प हे त्यांना असेच जुन्या बाजारात, फूटपाथवर मिळाले आहेत.

त्यांच्याकडे २०० हून अधिक प्राचीन शिल्प संग्रहितअसल्याची माहितीही डॉ. कोठारी यांनी दिली आहे. संग्रहित केलेल्या सर्व शिल्पांचा कालावधी शोधण्यासाठी आणि ते प्रमाणित करण्यासाठीचे सर्व प्रकारचे सोपस्कार त्यांनी केले आहेत. त्याचे प्रमाणपत्र आणि माहितीही त्यांनी शिल्पासोबत लावली आहे.
सहाव्या शतकापर्यंत मिळालेल्या गणेशमूर्तींमध्ये मूषक म्हणजेच उंदीर हे शिल्पात कुठेही दिसलेले नसून ते केवळ सहाव्या शतकानंतरच्या शिल्पांमध्ये दिसतात असा दावाही डॉ. कोठारी यांनी केला आहे. ते म्हणाले "मुंबईत मी मोठ्या धाडसाने हे प्रदर्शन भरवले आहे. माझे हे पहिलेच आणि अखेरचे प्रदर्शन ठरेल. कारण, मला यापुढे असा खर्च परवडणार नाही."

Intro:

जगातील सर्वात जुनी गणेशमूर्तीची चित्रलिपी मुंबईत... ती कुठे मिळाली पहा....

mh-mum-01-ganeshshilp-dr-prakashkothari-121-7201153

mh-mum-01-ganeshshilp-dr-prakashkothari-vhij-7201153

mh-mum-01-ganeshshilp-dr-prakashkothari-vhij-7201153
( हे सर्व फीड मोजे वर पाठवले आहे)

मुंबई, ता. २९ :

भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात प्राचीन आणि पहिल्या शतकातील सर्वात जुनी गणेश मूर्ती शिल्प चित्रलिपी मुंबईकरांना जवळून पाहण्यासाठी पहिल्यांदाच संधी उपलब्ध झाली आहे. ही गणेशमूर्ती पहिल्या शतकातील असून ती गुजरात येथील डॉ. प्रकाश कोठारी यांनी संग्रहित करून ठेवली आहे. जगातील सर्वात जुन्या या गणेशमूर्ती शिल्पाचे मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन सुरू असून ती सर्वांना जवळून पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे.
डॉ. कोठारी यांनी याबाबत सांगितले की, या गणेशमूर्तीचे चित्रशिल्प बारा वर्षांपूर्वी मला मुंबईच्या चोर बाजारात मिळाले होते. मला यावर तेव्हा ही इतकी प्राचीन असेल वाटले नव्हते. त्यावर एक बैलाचे चित्रा आणि मागे दोन हात असलेले श्री गणेश दिसले. नंतर मला त्यावर ब्राम्ही लिपीत काही तरी लिहिलेले आहे असे लक्षात आल्यानंतर मी पुरातत्व आणि त्यासाठीचे संशोधन करणाऱ्या मित्रांना ते पाठवले, आणि म्हैसूर आणि इतर ठिकाणच्या संशोधन संस्थांनी हे शिल्प चीनमध्ये असलेल्या सर्वात जुन्या गणेश शिल्पा पेक्षा जुने असल्याचे सांगितले तेव्हा त्याला प्रमाण मिळाले. तेव्हापासून मी देशात अनेक ठिकाणी फिरताना मला पहिल्या ते विसाव्या शतकापर्यंत अनेक गणेशशिल्प मिळाले. आज इथे विसाव्या शतकापर्यंतचे 60 शिल्प ठेवण्यात आले असून त्यासाठी प्रत्येकाचा कालावधी, ठिकाण आणि ते मला कुठे मिळाले हे प्रमाणशीर दिले आहे.

माझ्याकडे २०० हून अधिक प्राचीन शिल्प मी संग्रहित केले आहेत अशी माहितीही डॉ. कोठारी यांनी दिली. सद्या इथे
पेशवाचे काळातील श्री गणपती पंतप्रधान, मराठा नाणे ठेवले असून मी ते सव्वा चार लाख रुपयांना विकत घेतले होते. त्यासोबत अठराव्या शतकातील कोकशास्त्र, तामिळनाडू कार्तिकेय तामिळनाडू येथील लाकडावर कोरण्यात आलेली अठराव्या शतकातील कावड, दहाव्या शतकातील मला नेपाल येथे भेटले. ते महाबळीपुरम याची प्रतिकृती असलेले शिवलिंग असून त्यात संपूर्ण शिव पार्वती, गणेश हे शिव कुटुंब यात आहे. मला अनेक शिल्प हे असेच जुन्या बाजारात, फूटपाथ वरही कुंकवाचा बॉक्स अनेक शिल्प भेटले. ज्यावर गणेश जी यांचे चित्र काढण्यात आले आहे. मी संग्रहित केलेल्या सर्व शिल्पांचे मी वर्षे, शतक यासाठी त्यांचा कालावधी शोधण्यासाठी आणि ते प्रमाणित करण्यासाठी सर्व प्रकारचे सोपस्कार केले असून त्याचे प्रमाणपत्र आणि माहिती मी लावली असल्याचेही डॉ. कोठारी यांनी सांगितले.
सहाव्या शतकापर्यंत मिळालेल्या गणेशमूर्तींना त्यांचे वाहन असलेले मूषक म्हणजेच उंदीर हे कुठेही शिल्पात मला दिसलेले नाही मात्र ते सहाव्या शतकानंतर दिसतात असा दावाही डॉक्टर कोठारी यांनी केला. श्रीगणेश हे विघ्नहर्ता आहेत आणि आज ज्या गणेश मूर्ती पाहतो त्यांना चार हात किंवा त्याहून अधिक हात दाखवले जातात मात्र माझ्याकडे असलेली गणेश मुर्ती ही केवळ दोन हाताची असून ती सर्वात जुनी . असल्याचेही ते म्हणाले. मुंबईत आपण मोठ्या धाडसानं हे प्रदर्शन भरवले असून माझे हे पहिलेच आणि अखेरचे प्रदर्शन ठरेल कारण मला यापुढे असा खर्च परवडणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Body:जगातील सर्वात जुनी गणेशमूर्तीची चित्रलिपी मुंबईत... ती कुठे मिळाली पहा....
Conclusion:
Last Updated : Aug 30, 2019, 11:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.