ETV Bharat / state

Heavy rains In Mumbai: मुंबईच्या पूर्व उपनगरात जोरदार पाऊस; मध्य रेल्वेची वाहतूक व्यवस्था विस्कळीत, प्रवाश्यांचे हाल - Heavy rains In Mumbai

Heavy rains In Mumbai: मुंबईत पूर्व उपनगरामध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तासापासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे सार्वजनिक गणपतींचे विसर्जन (Heavy rains disrupt traffic) करण्यासाठी गणेश मंडळ पाऊस कमी होण्याची वाट पाहत आहेत; (Heavy rains disrupt traffic) परंतु मुसळधार पावसामुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. (Rains impact on Ganpati immersion) मध्य रेल्वे दहा ते पंधरा मिनिटांनी उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. (Rainfall in Mumbai)

Heavy rains In Mumbai
प्रवाश्यांचे हाल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 5:28 PM IST

मुसळधार पावसाचा रेल्वे आणि सामान्य वाहतुकीला फटका

मुंबई Heavy rains In Mumbai: आज सकाळपासूनच प्रचंड उष्णता मुंबईमध्ये जाणवत होती. दुपारी बारा वाजेनंतर अक्षरशः घामाच्या धारा निघत होत्या. सुमारे दीड ते दोन वाजेपासून हळूहळू पाऊस सुरू झाला; मात्र दोन वाजेनंतर तुफान पाऊस मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये सुरू झाला. याचा परिणाम मध्य रेल्वेवर झालेला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या आणि कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जलद आणि धीम्या लोकलवर परिणाम झालेला आहे. दहा ते पंधरा मिनिटं या लोकल उशिरानं धावत आहेत.

नागरिक पावसात भिजले: सार्वजनिक वाहतुकीमध्ये पूर्व उपनगरात रस्त्या रस्त्यावर धावणाऱ्या खासगी आणि सार्वजनिक वाहतूक यांच्यावर देखील यामुळे परिणाम झालेला आहे. गणपती पाहायला आलेले नागरिक छत्र्या घेऊन न आल्यामुळे त्यांना पावसात भिजावे लागले.

सार्वजनिक गणेश मंडळांवर परिणाम: सार्वजनिक गणेश मंडळ यांनी दुपारी बारा वाजेपासून विविध प्रकारची तयारी सुरू केली होती. मंडपातून गणेश प्रतिमा काढणे, देखावा काढणे, आरतीची तयारी करणे आणि आरती करून दुपारी जेवणानंतर सार्वजनिक गणेश मंडळातील सर्व कार्यकर्ते गणपती विसर्जनासाठी निघतात; परंतु दोन नंतर तुफान पाऊस सुरू झाल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणपतीचे विसर्जन काहीसे उशिराने होईल, असं चेंबूरचा राजा गणपतीचे कार्यकर्ते मिलिंद जाधव यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितलं.

काय म्हणाले जनसंपर्क प्रमुख? पाऊस दोन वाजेपासून जोरदार सुरू झाला. आता दीड तास होत आला. मात्र, पाऊस कमी होण्याचं चिन्ह नाही. त्यामुळे चाकरमान्यांना घरी जाण्याचे वेध लागलेले आहेत. परंतु, ट्रेन मिळते की नाही याची भीती देखील त्यांच्या मनात आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख डॉ. शिवराज मानसपुरे यांच्यासोबत बातचीत केली असता ते छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे कर्तव्यावर असल्यामुळे बैठकीमध्ये व्यस्त होते. मात्र, मध्य रेल्वे वरील सर्व रेल्वे वाहतुकीवर रेल्वे प्रशासनाचे लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वे प्रवाशी वेळेत आणि सुखरूप नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी मध्य रेल्वे विभाग तत्पर आहे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही डॉ. शिवराज मानसपुरे यांनी माध्यमांना सांगितले.

गणेश विसर्जनावर परिणाम: पूर्व उगमगरामध्ये 2 गौरी गणपती तर सार्वजनिक गणपतीचं विसर्जन अद्यापही सुरू झालेलं नाही. मात्र आतापर्यंत सकाळी अकरा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण 905 घरगुती गणपतीचं वाजत गाजत विसर्जन झालेलं आहे. परंतु जोरदार पाऊस पूर्व उपनगरामध्ये सुरू झाल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळ उशिराने विसर्जन केले जाण्याची दाट शक्यता आहे. दुपारी 2 वाजे पर्यंत पूर्व उपनगरात एकूण 905 पैकी एकूण घरगुती 531 गणपती आणि पाच गौरी यांचे विसर्जन कृत्रिम तलावामध्ये झालेले आहे. यामध्ये मुलुंड, घाटकोपर, चेंबूर कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी या ठिकाणचे घरगुती गणपती आणि गौरी गणपती यांचे विसर्जन केले गेले आहेत. अर्धा तासापूर्वीच कुर्ला घाटकोपर भांडुप विक्रोळी या परिसरात जोरदार विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरी कोसळत असून सार्वजनिक गणेश मंडळांवर याचा काहीसा परिणाम झालेला आहे. सार्वजनिक गणेश मंडळ पाऊस जाण्याची वाट पाहत आहेत.

हेही वाचा:

  1. Red Alert For Mumbai : मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
  2. Heavy Rain In Mumbai : संततधार पावसाचा मुंबईला फटका, अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांचे हाल
  3. Mumbai Rain Update: पाहा, मुंबईमध्ये अवकाळी पाऊस, ठिकठिकाणी साचले पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.