ETV Bharat / state

सलग चौथ्या दिवशी कोसळधार; पावसामुळे मुंबईची गती मंदावली - high tide

उशीरा आलेल्या पावसाच्या दमदार आगमनाने शहरातील सबंधित सेवा कोलमडायला लागली आहे. पावसाच्या सतत चौथ्या दिवशीच्या झपाट्याने मुंबईकरांचे हाल व्हायला लागले आहे. शहरातील विविध भागात पावसामूळे वेगवेगळ्या घटना घडल्या असून धावत्या मुंबईचा वेग पावसामूळे मंदावला आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 1, 2019, 9:18 PM IST

मुंबई - लांबलेल्या पावसाने मुंबईत दमदारपणे सुरुवात केली असून मागील चार दिवसांत ८५ टक्के इतका पाऊस झाला आहे. सलग चार दिवस पाऊस पडत असून सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रस्ते आणि रेल्वे सेवा कोलमडली. सायन, किंग्ज सर्कल रेल्वे रुळावर पाणी भरले होते. मुंबईतल्या सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूकही खोळंबल्याने मुंबईकरांचे हाल झाले. मुंबईकर ऑफिसला उशिरा पोहचल्याने लेटमार्कही लागला. येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत चौथ्या दिवशीही कोसळधार

रविवारी सकाळी जोरदार पाऊस कोसळून दुपारनंतर काही तास उघडीप घेतली व रात्री पुन्हा जोरदार बरसला. पावसाची संततधार सोमवारीही सकाळपासून कायम राहिल्याने मुंबईतील सखल भागात जागोजागी पाणी साचले होते. गांधी मार्केट, किंग सर्कल, दादर टीटी, हिंदमाता, चेंबूर, शेलकॉलनी, चेंबूर कॉलनी, आरसीएफ कॉलनी, प्रतीक्षा नगर, मिलन सबवे, अंधेरी सबवे, वांद्रे आदी ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, प्रतिक्षा नगर येथे गुडघाभर पाणी साचले होते. किंग्जसर्कल, सायन येथील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने या मार्गावरून जाणा-या प्रवाशांचे हाल झाले. तिन्ही मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली होती.

धारावी येथील मुख्याध्यापक नाला डेब्रिज, प्लास्टिक, फ्लोटींग मटेरियलने तुंबल्याने तेथे पाण्याचा निचरा करणा-या पंपामध्ये हा सर्व कचरा अडकून हा पंपच बंद पडला. त्यामुळे येथे पाणी निचरा करता न आल्याने परिसरात पाणी तुंबले होते. दादर येथील हिंदमाताजवळ नेहमीप्रमाणे यंदाही पाणी तुंबले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून ब्रिटानिया पंपिंग स्टेशन बांधूनही पाणी तुंबण्याची समस्या सुटलेली नाही. येथे मायक्रो टनेलिंगची कामे सुरु आहेत, मात्र त्या ठिकाणची जुनी खोलवर रुजलेली ५२ झाडे या कामासाठी अडथळा ठरत आहेत. त्यामुळे ही समस्या ही झाडे काढल्याशिवाय सुटणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सकाळी ११ वाजता हाईटाईड होती. मात्र, याचवेळी नेमका पाऊस थांबला होता. पाऊस जोरदार कोसळला असता तर मुंबई तुंबली असती.

शहरातील विविध दुर्घटना

विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू -
शिवाजी नगर गोवंडी येथे एलिगंड शाळेजवळ घरात विजेचा धक्का लागून महम्मद कैयुम काझी (३०) हे जखमी झाले. त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

९७ ठिकाणी झाडे, फांद्या पडल्या -
शहरात ४६, पूर्व उपनगरांत १२ व पश्चिम उपनगरांत ३९ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. तर १९ ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या. या घटनात कोणीही जखमी झालेले नाही.

रेल्वे वाहतूक विस्कळीत
मरिनलाईन्स येथे रेल्वेच्या हद्दीत बांधकामासाठी एकत्र ठेवण्यात आलेले लाकडी बांबू जोरदार हवेमुळे ओव्हरएड वायरवर पडले. त्यामुळे काही वेळाकरीता येथील वाहतूक थांबवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. सायन व कुर्ला येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्य़ाने वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. तर हार्बर मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनीटे उशिराने सुरु होती.

येथे साचले पाणी -

शहर - हिंदमाता, परळ टीटी, गांधी मार्केट, शक्कर पंचायत चौक, वडाळा, लक्ष्मी नारायण लेन, माटुंगा, सायन कोळीवाडा, रावळी कॅम्प, पोस्ट ऑफिस, हिंदू कॉलनी, किडवाई नगर कॉलनी, वडाळा, काळाचौक, दादर प्लाझा, रानडे रोड.
पूर्व उपनगर - पोस्टल कॉलनी, चेंबूर, नेहरु नगर, ब्रिज, कुर्ला, विद्याविहार रोड, कोहिनुर मॉल, कुर्ला, महाराष्ट्र नगर, मानखुर्द, फ्रीवे चेंबूर, पांजरापोळ टनेल, चेंबूर कॅम्प, कलेक्टर कॉलनी, एमजी रोड, घाटकोपर
पश्चिम उपनगरे - जवाहर नेहरू, खार, आदर्शनगर, एमएचबी कॉलनी, खेरनगर, बांद्रा बस डेपो

Intro:मुंबई -
मुंबईत लांबलेल्या पावसाने दमदारपणे सुरुवात केली आहे. सलग चार दिवस पाऊस पडत असून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रस्ते आणि रेल्वे सेवा कोलमडली. सायन, किंग्ज सर्कल रेल्वे रुळावर पाणी भरले होते. मुंबईतल्या सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूकही खोळंबल्याने मुंबईकरांचे हाल झाले. मुंबईकर ऑफिसला उशिरा पोहचल्याने लेटमार्कही लागला. येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.Body:मुंबईत लांबलेल्या पावसाने दमदारपणे सुरुवात केली असून मागील चार दिवसांत ८५ टक्के इतका झाला आहे. रविवारी सकाळी जोरदार कोसळून दुपारनंतर काही तास उघडीप घेत रात्री पुन्हा जोरदार बरसला. पावसाची संततधार सोमवारीही सकाळपासून कायम राहिल्याने मुंबईतील सखल भागात जागोजागी पाणी साचले होते. गांधी मार्केट, किंग सर्कल, दादर टीटी, हिंदमाता, चेंबूर, शेलकाॉलनी, चेंबूर कॉलनी, आरसीएफ कॉलनी, प्रतीक्षा नगर, मिलन सबवे, अंधेरी सबवे, वांद्रे आदी ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकीचा बोजवारा उडाला होता. किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, प्रतिक्षा नगर येथे गुडघाभर पाणी साचले होते. किंग्जसर्कल, सायन येथील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने या मार्गावरून जाणा-या प्रवाशांचे हाल झाले. तिन्ही मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली होती. धारावी येथील मुख्याध्यापक नाला, डेब्रिज, प्लास्टिक, फ्लोटींग मटेरियलने तुंबल्याने तेथे पाण्याचा निचरा करणा-या पंपामध्ये हा सर्व कचरा अडकल्याने हा पंपच बंद पडला. त्यामुळे येथे पाणी निचरा करता न आल्याने परिसरात पाणी तुंबले होते. दादर येथील हिंदमाताजवळ नेहमीप्रमाणे यंदाही पाणी तुंबले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून ब्रिटानिया पंपिंग स्टेशन बांधूनही पाणी तुंबण्याची समस्या सुटलेली नाही. येथे मायक्रो टनेलिंगची कामे सुरु आहेत, मात्र त्या ठिकाणची जुनी खोलवर रुजलेली ५२ झाडे या कामासाठी अडथळा ठरत आहेत. त्यामुळे ही समस्या ही झाडे काढल्याशिवाय सुटणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सकाळी ११ वाजता हाईटाईड होती. मात्र याचवेळी नेमका पाऊस थांबला होता. पाऊस जोरदार कोसळला असता तर मुंबई तुंबली असती.

विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू -
शिवाजी नगर गोवंडी येथे एलिगंड शाळेजवळ घरात विजेचा धक्का लागून महम्मद कैयुम काझी (३०) हे जखमी झाले. त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

९७ ठिकाणी झाडे, फांद्या पडल्या -
शहरात ४६, पूर्व उपनगरांत १२ व पश्चिम उपनगरांत ३९ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. तर १९ ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या. या घटनांत कोणीही जखमी झालेले नाही.

येथे साचले पाणी --
शहर -- हिंदमाता, परळ टीटी, गांधी मार्केट, शक्कर पंचायत चौक, वडाळा, लक्ष्मी नारायण लेन, माटुंगा, सायन कोळीवाडा, रावळी कॅम्प, पोस्ट ऑफिस, हिंदू कॉलनी, किडवाई नगर कॉलनी, वडाळा, काळाचौक, दादर प्लाझा, रानडे रोड.
पूर्व उपनगर -- पोस्टल कॉलनी, चेंबूर, नेहरु नगर, ब्रिज, कुर्ला, विद्याविहार रोड, कोहिनुर मॉल, कुर्ला, महाराष्ट्र नगर, मानखुर्द, फ्रीवे चेंबूर, पांजरापोळ टनेल, चेंबूर कॅम्प, कलेक्टर कॉलनी, एमजी रोड, घाटकोपर
पश्चिम उपनगरे -- जवाहर नेहरू, खार, आदर्शनगर, एमएचबी कॉलनी, खेरनगर, बांद्रा बस डेपो,

रेल्वे वाहतूक --
मरिनलाईन्स येथे रेल्वेच्या हद्दीत बांधकामासाठी एकत्र ठेवण्यात आलेले लाकडी बांबू जोरदार हवेमुळे ओव्हरएड वायरवर पडले. त्यामुळे काही वेळाकरीता येथील वाहतूक थांबवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. सायन व कुर्ला येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्य़ाने वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. तर हार्बर मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनीटे उशिराने सुरु होती.

बातमीसाठी आजच्या पावसाचे vis वापरावेत - Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.