ETV Bharat / state

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; राज्य सरकारकडून नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन

रविवारपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर कायम असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या वतीने नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर साचलेले पाणी
author img

By

Published : Jul 2, 2019, 7:38 AM IST

मुंबई - रविवारपासून कोसळणारा मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे. पावसाने अधिक जोर धरल्याने मुंबईत अनेकठिकाणी पाणी साचले आहे. हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून. राज्य सरकारकडून नागरिकांना बाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी पावसाचा फटका मुंबईतील तिन्ही रेल्वे वाहतुकीला बसला. मुसळधार पावसामुळे सुरक्षितेच्या दृष्टिकोणातून मध्य रेल्वेने कुर्ला ते ठाणे दरम्यानची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुंबईत विविध ठिकाणी भींती कोसळण्याच्या घटना शनिवारपासूनच घडत आहेत. यामुळे नागरिकांना बाहेर न पडण्याचा इशारा शासनाकडून देण्यात आला असून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

पावसामुळे मुंबईतील काही शाळांत पाणी शिरल्याने काल (सोमवार) काही शाळांना सुट्टी जाहीर केली होती. तर पालिकेकडून दोन दिवस सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Intro:Body:

राज्य शासनाचे आवाहन :

#मुंबई शहरासाठी देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

#MumbaiRain 

#Mumbai https://t.co/hb1Js4foQs

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.