ETV Bharat / state

मुंबईत पुन्हा पाऊस, पुढील काही तास पावसाचा हवामान खात्याचा अंदाज - मुंबई हवामान बातमी

मुंबई व उपनगरात आज सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. हा पाऊस पुढील दोन ते तीन तास असाच सुरू असेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पाऊस
पाऊस
author img

By

Published : Oct 3, 2020, 9:17 PM IST

मुंबई - मुंबईत ढगांच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह आज (दि. 3 ऑक्टोबर) पावसाला अचानक सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटासह पुढील दोन ते तीन तास पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईत जुलै आणि सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. यामुळे पावसाचा धसका मुंबईकरांनी घेतला आहे. सुटीच्या दिवशी सोडून कधीही अचानक पाऊस पडल्यास नागरिकांची तारांबळ उडते. कधी रस्त्यावर पाणी साचून वाहतूक ठप्प होईल या भीतीने मुंबईकरांच्या मनात धडकी भरते. आजही असाच काहीसा प्रकार सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान घडला. अचानक पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. गेले अनेक दिवस पावसाने मुंबईत विश्रांती घेतल्यामुळे अनेकांनी आज छत्री आणि रेनकोट वागवणे टाळले होते. यामुळे अनेकांची आडोशाला जाण्यासाठी तारांबळ उडाली. पुढील 2 ते 3 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

  • मुंबईत पावसाची नोंद (आज सायंकाळी 6 ते 7 दरम्यान)
  • पूर्व उनगर

घाटकोपर - 12 मिलिमीटर

भांडूप - 11 मिलिमीटर

भांडूप कॉम्प्लेक्स - 10.41 मिलिमीटर

  • पश्चिम उपनगर

गोरेगाव - 18 मिलिमीटर

मरोळ फायर स्टेशन - 10.16

हेही वाचा - खूशखबर..! यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.