मुंबई - चक्रीवादाळानंतर आता मुंबईत पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे मुंबईतील शिवाजी पार्क येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
मुंबईत सकाळपासून कोसळत असलेल्या पावसाने काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पूर्व, पश्चिम उपनगरात पावसाचा सकाळपासून जोर आहे. दक्षिण मुंबईलाही पावसाने झोडपले आहे. तर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे . संपूर्ण मुंबईवर सकाळपासून काळ्या ढगांची छाया दिसून आली.
दरम्यान, मुंबईतल्या सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे महापालिकेने मान्सून तयारीचे केलेले दावे फोल ठरले आहेत.