ETV Bharat / state

LIVE: मुंबईत आत्तापर्यंत 13.03 मिलिमीटर पावसाची नोंद, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

पुढील काही तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याबाबतची माहिती हवामान विभागाने आज (शनिवारी) सकाळी ६ च्या दरम्यान दिली.

मुंबईत कोसळधार
author img

By

Published : Jul 27, 2019, 8:17 AM IST

Updated : Jul 27, 2019, 2:14 PM IST

मुंबई - राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मागील २४ तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात १५० ते १८० मी.मी पाऊस झाला आहे. तसेच आजही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

LIVE UPDATE:

  • थोडा वेळ उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मुंबईत सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत 13.03 मिलिमीटर पावसांची नोंद झाली आहे. पूर्व उपनगरात 13.94 मिलिमीटर, तर पश्चिम उपनगरात 10.68 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
  • महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस दाखल. प्रवाशांना पाणी आणि बिस्कीटांचे वाटप. बचावासाठी एनडीआरएफचे पथकही रवाना.
  • मुसळधार पावसामुळे कर्जत-कल्याण-खोपोली रेल्वे सेवा विस्कळीत. उल्हास नदीला पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे सेवा विस्कळीत.
  • मुंबईत पावसामुळे विस्कळीत झालेली विमानसेवा सकाळी ७ नंतर पूर्ववत
  • पावसामुळे महालक्ष्मी रेल्वे बदलापूर आणि वांगणी दरम्यान अडकली. २ हजार प्रवासी आतमध्ये अडकले.

पावसामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी येतात. तसेच दुर्घटना घडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी त्यांच्या विभागातील पावसाची परिस्थिती पाहून सु्ट्टी देण्याचा निर्णय घ्यावा, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री आषिश शेलार यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

मुंबईत पुढील २४ तासात अतिवृष्टीचा इशारा

पुढील काही तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याबाबतची माहिती हवामान विभागाने आज (शनिवारी) सकाळी ६ च्या दरम्यान दिली. नागरिकांनी समुद्र किनारी जाणे टाळावे आणि गटाराची झाकणे उघडू नका, असे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे. तसेच आपत्तीच्या परिस्थितीत १९१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ट्विटरवरुन केले आहे.

मुंबईसह कोकणातही जोरदार पाऊस सुरु आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असून रस्त्यांवर पाणी साचले आहे. रेल्वे रुळावंर पाणी साचले असून लोकल सेवा प्रभावीत झाली आहे. याबरोबरच विमान सेवाही विस्कळीत झाली आहे.

Intro:Body:

Reviewed heavy rainfall situation at all parts of state,considering local rainfall situation concerned Headmaster /principal can take decision for declaring holiday to schools at their level for Saturday 27/7/2019 !

Conclusion:
Last Updated : Jul 27, 2019, 2:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.