ETV Bharat / state

Hearing On Hasan Mushrif Sons Bail: हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांच्या जामीन अर्जावर सुनावणी 1 जून रोजी होणार

author img

By

Published : May 4, 2023, 8:23 PM IST

कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या तिन्ही मुलांवर देखील आरोप आहे. त्यामुळेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्या मागे ससेमिरा लावला आहे. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. आज त्याबाबत सुनावणी होणार होती; परंतु न्यायालयाने ती तहकूब करीत 1 जून 2023 रोजी सुनावणी निश्चित केली.

Hearing On Hasan Mushrif Sons Bail
जामीन अर्जावर सुनावणी 1 जून रोजी होणार

मुंबई: आमदार हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज याआधी मुंबई सत्र न्यायालयाकडून फेटाळला गेला होता. आता मुलांना देखील त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जातोय की काय? याची धास्ती लागली आहे. जेव्हा हसन मुश्रीफ यांच्याबाबतचा कोणताही निकाल लागेल त्या निकालाचे परिणाम त्यांच्या तीनही मुलांच्या निकालावर होणार असल्याची दाट शक्यता आहे.

जामिनावर उद्या सुनावणी: हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी आहे. तसेच अंतरिम दिलासा द्यावा म्हणून देखील त्यांच्या दुसऱ्या याचिकेची सुनावणी आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या मुलांच्या याचिकेचे भविष्य यांच्या उद्याच्या न्यायालयीन निकालानंतर स्पष्ट होईल. मुश्रिफांची तीनही मुले साजिद, आबिद आणि नाबित यांना अटकेपासून संरक्षण मिळते किंवा नाही, हे उद्या स्पष्ट होईल.

हे आहे 'ईडी'चे मत: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांच्या बाबतीत अटकपूर्व जामीन देण्यासाठी विरोध केलेला आहे. त्यांनी सातत्याने आपली बाजू मांडलेली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. त्यामध्ये या तीनही मुलांचा सहभाग असल्याचे स्पष्टपणे दिसते. तसेच चार्टर्ड अकाउंटंट महेश गुरव यांचा देखील सहभाग असल्याचे म्हणणे आहे. या आधारेच त्यांना अटकेपासून संरक्षण देता कामा नये, असे मत 'ईडी'ने न्यायालयापुढे मांडले आहे.

वकिलांचा 'ईडी'वर आरोप: ज्येष्ठ वकील आबाद फोंडा यांनी हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांच्या संदर्भात बाजू मांडली होती. त्यानुसार सक्तवसुली संचालनालय हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन खटले दाखल करीत आहे. त्यामुळेच ते चौकशीला तयार आहेत. चौकशी होऊ द्यावी, परंतु कुठल्याही कारणास्तव जोर-जबरदस्ती होऊ नये आणि याबाबत उच्च न्यायालयाने तसे निर्देश दिलेले आहेत, असे वकील फोंडा म्हणाले.

मुश्रीफांच्या मुलांना अटकेची भीती: या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांचे तीनही मुले साजिद, नाबीद आणि आबिद यांना अटकेपासून संरक्षण मिळते की नाही, याबाबत 1 जून 2023 रोजी दिशा स्पष्ट होईल; परंतु तोपर्यंत त्यांना अटक होण्याची धास्ती आहेच. मात्र, याबाबत हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात अंतरिम जामीन मिळण्यासाठी 5 मे रोजी जो निकाल येईल त्यावरून देखील त्यांच्या मुलांच्या संदर्भातील जामिनाची दिशा स्पष्ट होईल.

हेही वाचा: Nagpur Crime : बलात्कारी वसंत दुपारेला फाशी होणारच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दया अर्ज फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.