ETV Bharat / state

कोरोना योद्ध्यांना आरोग्यमंत्री टोपेंचा सलाम; ट्विटरवर शेअर केला खास व्हिडिओ - राजेश टोपे कोरोना योद्धा व्हिडिओ

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. या संकटाच्या काळात अनेक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत आहेत. सध्या अनेक डॉक्टरांनाही कोरोनाने ग्रासले आहे, असे असूनही डॉक्टर एखाद्या योद्ध्यासारखे लढत आहेत. या कोरोना योद्ध्यांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सलाम केला आहे.

Rajesh Tope
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
author img

By

Published : Jul 2, 2020, 5:48 PM IST

मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. या संकटाच्या काळात अनेक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत आहेत. या कोरोना योद्ध्यांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सलाम केला आहे. "तसा तुमचा कुठला असा एक दिवस असू नये. कारण डॉक्टर्स नेहमीच देवासमान आहेत. कोविडसारख्या कठीण प्रसंगात डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस, मीडिया प्रतिनिधी यांनी जे कर्तव्य बजावलंय ते अतुलनीय आहे", असे ट्विट टोपे यांनी केले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शेअर केलेला व्हिडिओ

ट्विटसोबत टोपे यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई दिसते. मध्येच 'लॉकडाऊन' अशी अक्षरे दिसतात व पूर्णपणे थांबलेली मुंबई नजरेस पडते. त्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव डॉक्टर व आरोग्य सेवकांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना दिसतो. आरोग्यमंत्री टोपे यांनीही या व्हिडिओत संदेश दिला आहे. 'ही मुंबई, हे राज्य आणि हा देश पुन्हा धावेल. पुन्हा हसण्या-खिदळण्याचे आवाज येतील. नवी आशा, नवी उमेद घेऊन सगळे मिळून करोनाला हरवू,' असे त्यांनी म्हटले आहे. 'एक सलाम सैनिकांना, एक कोरोना योद्ध्यांना' या ओळीने त्यांनी आपल्या संदेशाचा समारोप केला आहे.

सध्या अनेक डॉक्टरांनाही कोरोनाच्या आजाराने ग्रासले आहे, असे असूनही डॉक्टर एखाद्या योद्ध्यासारखे लढत आहेत. राजेश टोपे यांनी आत्तापर्यंत अनेकवेळा डॉक्टरांशी संवाद साधला आहे. त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. आता पुन्हा आरोग्य मंत्री टोपे यांनी खास व्हिडिओ शेअर करून व पत्र लिहून डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.