ETV Bharat / state

राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण 1 मार्चपासून

author img

By

Published : Feb 9, 2021, 8:54 PM IST

Updated : Feb 9, 2021, 9:29 PM IST

आतापर्यंत एकूण 5 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि 'फ्रंटलाइन वर्कर्स' यांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे 1 मार्चपासून होऊ शकते, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई
मुंबई

मुंबई - राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरू असून 652 केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत एकूण 5 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि 'फ्रंटलाइन वर्कर्स' यांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे 1 मार्चपासून होऊ शकते, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई

मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे लसीकरण सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे 40 ते 45 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे. तसेच युकेमधून प्रसारित झालेल्या नवीन विषाणूची लक्षणे नव्याने आढळून आलेली असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

4 लाख 68 हजार 293 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

आतापर्यंत कोविन पोर्टलवर 10 लाख 54 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी 4 लाख 68 हजार 293 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. 5 लाख 47 हजार फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी झाली असून त्यापैकी 41 हजार 453 जणांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील व ज्यांना सहव्याधी आहे, अशा 50 वर्षाखालील व्यक्तींना लसीकरण करणार असून त्यासंदर्भात केंद्र शासनकडून सूचना मिळाल्या नाहीत. साधारणपणे दि.1 मार्चच्या सुमारास त्यांची नोंदणी सुरू होण्याची शक्यता असून त्यानंतर लसीकरण केले जाईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात लसीकरणादरम्यान कुठेही गंभीर दुष्परिणामाच्या घटनांची नोंद झाली नाही. लसीकरण सुरू असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असून मास्कचा वापर, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

Last Updated : Feb 9, 2021, 9:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.