ETV Bharat / state

आठवड्यासाठी लागणाऱ्या लसी द्या; आरोग्य मंत्री टोपे यांची केंद्राकडे मागणी - राजेश टोपे कोरोना लसीकरण माहिती

देशात सर्वात जास्त कोरोना रूग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्याची लोकसंख्या देखील जास्त आहे. त्यामुळे साहजिकच राज्यात जास्त लसींची आवश्यकता आहे. लसीकरणाची क्षमता देखील जास्त आहे. मात्र, आमच्या क्षमतेच्या तुलनेत केंद्राकडून लस मिळत नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Rajesh Tope corona vaccines demands to center
राजेश टोपे केंद्र सरकार कोरोना लस मागणी बातमी
author img

By

Published : Apr 10, 2021, 1:15 PM IST

मुंबई - केंद्र सरकार मदत करत आहे मात्र, ती अपेक्षेप्रमाणे नाही. महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना केली असता, गुजरातची लोकसंख्या किती? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? याचा विचार करायला हवा. गुजरातला 1 कोटी लसी दिल्या व महाराष्ट्राला 1 कोटी 4 लाख लसी दिल्या. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आहेत. आम्हाला एका आठवड्यासाठी लागणाऱ्या लसी द्या, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. ते याची दखल घेतील, अशी अपेक्षा असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

आरोग्य मंत्री टोपे यांनी केंद्राकडे लसीची मागणी केली

महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. आम्ही पारदर्शक पद्धतीने कारभार करत आहोत. सर्व चाचण्या केंद्र सरकारच्या निर्देशानुसार करत आहोत. महाराष्ट्रात 70 टक्के आरटीपीसीआर आणि 30 टक्के अँटिजेन चाचण्या होतात. उत्तर प्रदेशात 90 टक्के अँटिजेन टेस्ट होतात. मात्र, मुंबई आणि पुण्यामध्ये उलट असून टेस्टिंग वाढवले आहे. दहा लाखांमागे तीन ते चार लाख लोकांचे टेस्टिंग सुरू आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

केंद्र आणि राज्याने हातात हात घालून काम करावे -

महाराष्ट्रासाठी 30 जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या टीम आलेल्या आहेत. त्या लसीकरण, रेमडेसिवीर, उपलब्ध सोयी-सुविधा यांची माहिती घेणार आहेत. महाराष्ट्र हे 50 टक्के शहरीकरण झालेले राज्य आहे. त्यामुळे त्याची इतर राज्यांशी तुलना करता येणार नाही. आम्हाला जनतेची काळजी आहे. त्यामुळे वाद न घालता हातात हात घालून केंद्र आणि राज्याने काम केले पाहिजे. राज्यात आठवड्याला 40 लाख वॅक्सिन लागते. लसी अभावी सातारा, सांगली , पनवेलमध्ये लसीकरण बंद पडले आहे. याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दिली आहे. तसेच, हापकिनला लस बनवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी देखील केल्याचे टोपे यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन -

प्रत्येक जिल्ह्यात लिक्वीड ऑक्सिजन बसवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिल्याचे टोपेंनी सांगितले. मुख्यमंत्री आणि शरद पवार रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांशी बोलत आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्य राज्याचा विषय असला तरी लसीकरण हा केंद्राचा कार्यक्रम आहे. त्यामुळे केंद्राने आम्हाला आमच्या गतीप्रमाणे लस उपलब्ध करून द्यावी, असे राजेश टोपे म्हणाले.

बाबांनो, हे नफेखोरीचे दिवस नव्हे -

महाराष्ट्राची कामगिरी चांगली नाही म्हणून कोरोना वाढतो हे सांगितले जात आहे. मात्र, हे चुकीचे आहे. महाराष्ट्राकडे दीड दिवसाचा लस साठा शिल्लक आहे. अनेक जिल्ह्यात लसीकरण ठप्प झाले आहे. आरटीपीसीआर चाचणीचा दर 4 हजार 500 होता तो 500 रुपयांवर आणला. रेमडेसिवीरची किंमत 1 हजार 200 रुपयांवर आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. काही खासगी दवाखाने गरज नसताना रेमडेसिवीर वापरतात. हे महामारीचे दिवस आहेत, नफेखोरीचे नाहीत. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक औषधांचा वापर करावा, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

हेही वाचा - सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण; खासगी रूग्णालयात उपचार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.