ETV Bharat / state

कोरोना विरोधातील लढाईत पुढाकार घ्या; आरोग्य मंत्र्यांचे विद्यार्थी, तरुणांना आवाहन - minister Rajesh Tope Appeal Student

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून विद्यार्थी आणि तरुणांना भावनिक पत्राद्वारे आवाहन केले आहे. तसेच, कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी विद्यार्थ्यांकडे मदतीची मागणी केली आहे.

Health Minister Rajesh Tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Feb 24, 2021, 9:49 PM IST

मुंबई - राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे, राज्यातील सर्व यंत्रणा पुन्हा एकदा जोमाने कामाला लागल्या आहेत. काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी नियमांचे पालन करा, मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सूचनांचे पालन करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून वारंवार केले जात आहे. तर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील रुग्णालयातून विद्यार्थी आणि तरुणांना भावनिक पत्राद्वारे आवाहन केले आहे. तसेच, कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी विद्यार्थ्यांकडे मदतीची मागणी केली आहे.

Health Minister Rajesh Tope letter
पत्र

हेही वाचा - आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर; सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे आदेश

कोरोनाने गाठले

२०२० च्या मार्च महिन्यात कोरोनाने राज्यात शिरकाव केला. त्यानंतर आरोग्य प्रशासनासह महापालिका प्रशासन सज्ज झाले. या दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील दररोज राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आढावा घेत होते. त्या दरम्यान, त्यांच्या आईची तब्येत देखील खालावली होती. मात्र, आईची सेवा करून ते नागरिकांसाठी अहोरात्र मेहनत घेत होते. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर देखील कामाचा धडाका चालू ठेवला होता. त्यांनी त्या दिवशी देखील काम केले. अक्षरश: पायाला भिंगरी लागल्यासारखे त्यांच्या कामाचा धडाका सुरू होता. मात्र, त्यांना त्यावेळी कोरोनाची बाधा झाली नाही. पण, आता डोके वर काढलेल्या कोरोनाने त्यांना गाठले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची बाधा झाली असून सध्या ते उपचार घेत आहेत. मात्र, रुग्णालयात असताना देखील कोरोना विरोधात लढाई लढायची असल्याचे आवाहन टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला, विशेष करून विद्यार्थी आणि तरुणाईला केले.

काय आहे आरोग्यमंत्र्यांचे भावनिक पत्र?

प्रिय विद्यार्थी मित्रांनो, शाळा, महाविद्यालये नुकतेच सुरू झाले आहेत आणि कोरोना नुकताच वाढताना दिसत आहे. कोरोना विरुद्ध लढाई गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. तुमच्या सर्वांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मदतीने ही लढाई आपण नक्कीच जिंकणार, यात शंका नाही. तुमचे खेळण्याचे, बागडण्याचे हे वय, क्रिडांगणावर घाम गाळण्याचे हे वय. परंतु, गेले वर्षभर तुम्हाला घरातच बसावे लागले. कोरोनावर मात करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ती अशी की, प्रथम तुम्ही तुमचीच काळजी घ्या. त्याचबरोबर, आपल्या आई-वडिलांची, भाऊ-बहिणीची आणि शेजार्‍यांचीही काळजी घ्या. आई-वडिलांना कामानिमित्त बाहेर जावे लागते. बाहेरून आल्यावर त्यांनी हात-पाय स्वच्छ धुतलेत की नाही, ते पहा. त्यांनी बाहेर जाताना मास्क लावला की नाही, ते पहा. सॅनिटायझर वापरले की नाही, ते देखील पहा. शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले जातात की नाही, ते पहा. जर कदाचित कोरोनाचे काही लक्षण दिसलेच, तर लगेच सरकारी दवाखान्यात त्यांना घेऊन जा. त्यांची काळजी घेण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मित्रांनो, आजचा विद्यार्थी आणि तरुण देशाचा उद्याचा आधारस्तंभ आहे. तरुणाचे शरीर सुदृढ, मन सकारात्मक आणि बुद्धी सतेज पाहिजे, तरच त्याला योग्य वेळी, योग्य निर्णय घेता येतात. तेव्हाच तो जीवनात यशस्वी होतो. तर, मग चला मला करणार ना मदत. मला तुमची खात्री आहे. आपण ही लढाई नक्कीच जिंकणार, असे टोपे यांनी पत्रात म्हटले.

हेही वाचा - कर्नाटक सीमेवर तपासणी तर मध्यप्रदेश सीमेवर कोरोनाचे नियम पायदळी; पाहा रियालिटी चेक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.