मुंबई- लोकलच्या वेळेत वाढ व्हावी यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याशी चर्चा केली. लवकरच लोकलच्या वेळेत वाढ करण्यात येणार असल्याची आशा टोेपे यांनी व्यक्त केली आहे.
लोकलच्या वेळेत मर्यादा
लॉकडाऊननंतर जवळपास १० महिन्यानंतर सर्वसामान्यांसाठी मुंबईची लाईफ लाईन लोकल सेवा खुली करण्यात आली. मात्र, लोकल सूरु झाली असली तरी सर्वसामान्यांसाठी लोकलच्या वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. या घालून दिलेल्या वेळेत चाकरमान्यांनी प्रवास करायचा कसा असा प्रश्न आता सर्वसामान्य मुंबईकर विचारू लागला आहे. गैरसोईच्या वेळामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून सरकारच्या निर्णयावर मुंबईकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुंबईकरांची नाराजी लक्षांत घेता सरकारने याची गंभीर दखल घेऊन यावर तोडगा काढणार आल्याचे राजेश टोपेंनी सांगितलं.
लोकलच्या वेळ सर्वसामान्यांसाठी गैरसोयीची
राज्य शासनाने १ फेब्रुवारीपासून लोकलसेवा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. पहिली लोकल ते सकाळी ७ वाजेपर्यंत, तसेच दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजे वाजेपर्यंत आणि रात्री ९ वाजल्यापासून ते शेवटच्या लोकलपर्यंत हा प्रवास सर्वसामान्य प्रवाश्यांना करण्याची मुभा देण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे. पण वेळेच्या मर्यादेचा काही परिमाण दिसत नाहीये. उलट गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. घालूनही गर्दी कायम आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या वेळेत अजून वाढ व्हावी किंवा वेळेची मर्यादा न ठेवता लोकलने सर्वसामान्यांना प्रवास करता यावा, अशी मागणी मुंबईकर करताना दिसत आहेत.