मुंबई - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तब्बल 4 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेल्या एचडीआयएल कंपनीचे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. यापैकी राकेश वाधवान (67) याच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल होऊ देण्याची याचिका दाखल करण्यात आली. मात्र, न्यायालयाने वाधवानला केईएम रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
राकेश वाधवानच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आरडी देशमुख व न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावर राकेश वाधवान याच्या वकिलांकडून मागणी करण्यात आली, की राकेश वाधवान याच्यावर एंडोस्कोपी व अन्य चाचण्या करण्यासाठी सर्व सुविधा व तज्ज्ञ डॉक्टर असलेल्या रुग्णालयाची गरज आहे. यासाठी खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील. मात्र, यावर ईडीकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे वाधवानने अगोदर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार घ्यावेत आणि त्याचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करावा. त्यानंतर गरज भासल्यास राकेश वाधवान यास खासगी रुग्णालयात स्वतःच्या खर्चाने उपचार करण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असे उच्च न्यायालयाने सुचित केले आहे.
पीएमसी बँक प्रकरण : आरोपी राकेश वाधवानने आधी केईएममध्ये उपचार घ्यावेत - उच्च न्यायालय
राकेश वाधवान याच्यावर एंडोस्कोपी व अन्य चाचण्या करण्यासाठी सर्व सुविधा व तज्ज्ञ डॉक्टर असलेल्या रुग्णालयाची गरज आहे. यासाठी खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील. मात्र, यावर ईडीकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे वाधवानने अगोदर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार घ्यावेत आणि त्याचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करावा, असे न्यायालयाने सुचित केले आहे.