मुंबई - काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्य क्षचंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते.
यावेळी आपले मनेगत व्यक्त करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, "महाराष्ट्राचेया राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरेल. आमच्यासारख्या अन्यायग्रस्तांना भजपचाच आधार आहे. मी कुठलीही अट घालून भाजपमध्ये आलेलो नाही. माझ्यावर पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती प्रत्येक जबाबदारी मी पार पाडेल." पाच वर्षात मुख्यमंत्र्यांचा चेहरा कायम हसरा राहिला आहे आता हर्षवर्धन आला असल्याने हास्य अधिक वाढेल अशी मिश्कील प्रतिक्रीयादेखील त्यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन यांचे पक्षात स्वागत केले. ते म्हणाले, भजप हा एका परिवाराचा पक्ष नाही. ज्यांना निष्ठेने वागायचे आहे त्यांना आता भाजशिवाय पर्याय नाही. हर्षवर्धन यांनी मंत्री म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. 5 वर्षांपासून हर्षवर्धन ते पाटलांच्या पक्ष प्रवेशाची वाट पाहत होते असेही फडणवीस यांनी यावेळी संगितले. हर्षवर्धन यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला नक्की होईल. येत्या काळात युतीच निवडून येईल आणि आता त्यात इंदापूरच्या जागेचाही समावेश असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.