ETV Bharat / state

IIT Student Suicide Case : दर्शन सोळंकीच्या मृत्यूला जातीभेदाची वागणूक कारणीभूत; कुटुंबियांचा आरोप - IIT Student Suicide Case

मुंबईच्या आयआयटी या उच्च शिक्षण संस्थेत दर्शन सोळंकी याच्या मृत्यूस जातीभेदाची वागणूक कारणीभूत असल्याचे सांगितले. त्याचे काका देवांग कुमार यांनी थेट आयआयटीवरच आरोप केलेला आहे. तसेच या आयआयटीमध्ये जातीय भेदभाव झाल्यावर समुपदेशन व्यवस्था असूनही आमच्या मुलाच्या मृत्यूला ते रोखू शकले नाही, असे ते म्हणाले. दर्शन सोळंकी याचा अंत्यविधी गुजरातमध्ये उरकल्यावर आम्ही मुंबईत येऊ. त्याबाबतची तक्रार दाखल करू, असे वक्तव्य त्यांनी केलेला आहे.

Darshan Solanki Death Case Mumbai
काका देवांग कुमार
author img

By

Published : Feb 16, 2023, 4:19 PM IST

मुंबई: देशातील नावाजलेल्या अभियांत्रिकी शिक्षण संस्थेमध्ये अर्थात आयआयटी मुंबई येथे रसायनशास्त्र अभियांत्रिकी प्रथम वर्ष शिकणारा दर्शन सोळंकी हा दलित जातीमधून आलेला आहे. त्याला त्या ठिकाणी मिळालेली जातीभेदाच्या भेदभावाची वागणूक त्याच्या मृत्यूला कारण ठरल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला होता. तसेच आंबेडकर पेरिया स्टडी सर्कल या आयटीमधील विद्यार्थी संघटनेच्या वतीने देखील तसेच म्हटलेले आहे. गुजरातमध्ये दर्शन सोळंकी आणि त्याचे कुटुंब राहतात. त्याच्या काकांनी देखील आता आयआयटी मुंबईवर थेट आरोप केलेला आहे की, या ठिकाणी जातीभेदाच्या हीन वागणुकीमुळेच आमच्या मुलाचा मृत्यू झाला.

दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही दुसरी घटना: कोरोना महामारीच्या काही काळ आधी आयआयटी मुंबई येथे शिकणारा अनिकेत अंभोरे हा दलित विद्यार्थी याने देखील अशाच प्रकारे स्वतःचा जीव संपाला होता आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत जातीभेदाची वागणूक होती, असे त्यावेळेला देखील विद्यार्थ्यांनी म्हटले होते. मात्र अशा घटनांची नि:पक्षपातीपणे चौकशी होणे दुरापास्त असल्यामुळे पालक खचून जातात आणि पुढे त्या केसचा पाठपुरावा करू शकत नाही. त्यामुळेच कायद्याच्या अनुषंगाने आयआयटी मुंबई आणि स्थानिक पोलीस स्थानिक यांनी तपास करणे जरुरी आहे, असे देखील आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. आयआयटी मुंबईमध्ये एससी एसटी सेल आहे स्टुडन्ट वेलनेस सेंटर आहे त्याचा उपयोग नाही, असा आरोप मृत दर्शन सोळंकेचे काका आणि आयआयटी मुंबई मधील विद्यार्थ्यांचा केला आहे.

केवळ दलित असल्याने भेदभाव? हे दलित तरुण रिझर्वेशन कोट्यातून आलेले आहेत. यांच्याकडे दर्जा नाही यांच्याकडे क्वालिटी नाही आणि हे दलित जातीतून आलेले आहे, अशा पद्धतीचे शेरे टोमणे अनिकेत अंभोरेच्या वेळी देखील मारले गेले होते, अशी माहिती त्याच्या पालकांनी वृत्तपत्रातून दिली होती. आता याच पद्धतीने दर्शन सोळंकीचा मृत्यू झालेला आहे. मुंबई आयआयटीमधील आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल या विद्यार्थी संघटनेने म्हटलेले आहे.

एससी एसटी सेलची प्रतिक्रिया: आयआयटी मुंबई या ठिकाणी दलित विद्यार्थ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र शासनाने देखील दखल घ्यायला हवी होती. कारण 1 नोव्हेंबर 2022 रोजी अनुसूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या तणावातून त्यांना बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय आणि मानसोपचार मदत मिळणे गरजेचे आहे; हे पत्राद्वारे देशाच्या शिक्षण मंत्रालयाला विद्यार्थ्यांनी कळवले होते. संबंधित वैद्यकीय अधिकारी मानसशास्त्रज्ञ हे मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडे जाण्याचा काही सल्ला दिला होता किंवा काय? असे प्रश्न आयटी मुंबईच्या अनुसूचित जाती जमाती कक्षाला ईटीवी भारत वतीने विचारण्यात आले होते. त्या प्रश्नांना उत्तरे देताना आयटी मुंबईचे एससी एसटी कक्ष सदस्य मधु वेलूर यांनी सांगितले की, आम्ही आयआयटी आवारा मधील विद्यार्थ्यांखेरीज कोणाशी बोलू शकत नाही. त्याबद्दल बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही. मात्र विद्यार्थ्यांनी जो आरोप केलेला आहे त्या अनुषंगाने आयटी मुंबई चौकशी करेल. यावर आम्ही काहीही बोलू शकत नाही, असे त्यांनी मत व्यक्त करताना नमूद केले.

देवांगच्या काकांचे मत: आयआयटी मुंबईच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रशासन आणि त्यांच्यासोबत जे व्हाट्सअप वर चॅट केले त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांनी निर्भयपणे मत व्यक्त केले. दर्शन सोळंकी याला जातीय भेदभावाची मिळाली होती आणि एससी एसटी सेल किंवा स्टुडन्ट वेलनेस सेंटर याचा काही उपयोग झालेला नाही. विद्यार्थ्यांचा हा whatsapp स्क्रीन शॉट ईटीव्ही भारतकडे प्राप्त झाला आहे. दर्शन सोळंकेच्या मृत्यूस जबाबदार जातिभेदाची वागणूक आहे.

हेही वाचा : ST Driver Suicide : वेळेत पगार न मिळाल्याने एसटी चालकाची आत्महत्या; एसटी कर्मचाऱ्यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.