ETV Bharat / state

Hanuman Chalisa Row: उशीरा पोहोचल्याने नवनीत राणांना न्यायालयाने फटकारले, पुढील सुनावणी 19 जूनला - मुंबई सत्र न्यायालयात

खासदार नवनीत राणा या न्यायालयात उशीरा आल्याने त्यांना न्यायाधीशांनी चांगलेच फटकारले. पुढच्या वेळी लवकर न्यायालयात या अशी तंबीही न्यायालयाने दिली. हनुमान चालिसा प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जूनला होणार असल्याचे न्यायालयाने यावेळी सांगितले.

Hanuman Chalisa Row
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 30, 2023, 1:12 PM IST

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जबरदस्तीने हनुमान चालिसा वाचल्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज मुंबई सत्र न्यायालयात पार पडली, मात्र न्यायालयात वेळेवर न आल्यामुळे न्यायालायाने खासदार नवनीत राणा यांना चांगलेच फटकारले. पुढील वेळी वेळेवर न्यायालयात येण्याची तंबीही न्यायालयाने नवनीत राणा यांना दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जून रोजी होणार आहे.

हनुमान चालिसा प्रकरण गाजले देशभरात : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हटल्याप्रकरणी कायदा सुव्यवस्थेचा भंग केला गेला होता. त्यात नवनीत राणा या आरोपी आहेत. राणादाम्पत्य सातत्याने सुनावणीसाठी गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेस व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश दिले होते. राणादाम्पत्य कोर्टात हजर राहिले नाहीत तर त्यांच्या नावे वॉरंट काढावे लागतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे आज रवी राणा आणि नवनीत राणा हे दोघेही न्यायालयात हजर राहिले.

चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा दावा : राणा दाम्पत्याने या आरोपामधून दोष मुक्ती मिळावी, यासाठी सत्र न्यायालयामध्ये अर्ज देखील केलेला आहे. त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे हे चुकीचे असल्याचा त्यांचा दावा आहे. पोलिसांनी त्यांच्यावर चुकीचा एफआयआर दाखल केलेला आहे. त्यामुळे हा एफआयआर रद्द करण्याची मागणी राणा दाम्पत्याने केली आहे. मात्र पोलिसांनी नवनीत राणा यांचा दावा हा मागच्या वेळीच प्रतिज्ञा पत्राआधारे फेटाळून लावला होता.

मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याचा दावा फेटाळला : मात्र उपलब्ध पुरावे आणि दस्तावेज पाहता राणा दाम्पत्याचा दावा पोलिसांनी फेटाळून लावला होता. त्यामुळे न्यायालयाने उलट पक्षी राणा दांपत्यांनाच हजर राहत नाही आणि विसंगत विधाने करतात याबाबत फटकारले होते. कोर्टाने फटकारल्यानंतर राणा दाम्पत्याच्या वकिलांनी लेखी हमी दिली आहे. वकिलांनी लेखी हमी देण्यास सुरुवातीला नकार दिला होता. लेखी हमी दिल्यामुळे आता आजच्या सुनावणीसाठी राणा दांपत्य यांना उपस्थित राहणे बंधनकारक झाले होते.

हेही वाचा -

  1. Maharashtra Politics : नाना पटोले हटाव मोहिमेने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, जाणून घ्या सविस्तर
  2. Bombay lawyers association News : सर्वोच्च-उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर राजकीय नियुक्तीपासून रोखा-बॉम्बे लॉयर असोसिएशनची याचिका
  3. Ajit Pawar on Seat Allocation: कुठल्याही पक्षाकडे मोदींविरोधात लढण्यासाठी ताकद नसल्याने...अजित पवारांचे जागा वाटपाबाबत स्पष्ट वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.