मुंबई Mumbai Special Court : 2022 मध्ये मुंबईत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री या ठिकाणी 'हनुमान चालीसा आम्ही म्हणणार' (Hanuman Chalisa controversy) अशी घोषणा राणा दाम्पत्यांनी केली होती. त्यांचे समर्थक आणि त्यांच्या संघटनेचे लोकं विदर्भातून मुंबईत आले होते. त्यांच्या या घोषणामुळे शिवसेनेचे अनेक समर्थक जिद्दीला पेटले होते. यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. (bailable warrant)
राणा दाम्पत्यांची याचिका फेटाळली: त्यावेळेला मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर बेकायदेशीररित्या आंदोलन केलं, शासनाच्या कामकाजात अडथळा आणला असे गुन्हे दाखल केलेले होते. हे गुन्हे रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्यांनी मुंबईच्या विशेष न्यायालयात दोष मुक्ततेची याचिका दाखल केली होती. ती मागच्या वेळेलाच न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. परंतु आज आरोप निश्चितीच्या वेळी आरोपीच हजर नसल्यामुळं न्यायालय संतापले आणि आता 19 जानेवारी रोजी अखेरची संधी असेल, असे म्हणत आजची सुनावणी न्यायाधीश राहुल रोकडे यांनी तहकुब केली.
ऑनलाईन सुनावणीकरिता विनंती: राणा दाम्पत्यांच्या वतीनं वकिलांनी मुद्दा मांडला की, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल आहे. दोन्ही लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना जनतेच्या विकासाच्या प्रश्नांसंबंधी बैठक असल्यामुळे ते या ठिकाणी सुनावणी करिता हजर राहू शकले नाही. तसेच ऑनलाईन न्यायालय सुनावणी करता हजर राहण्याची न्यायालयाने परवानगी देखील द्यावी, असं देखील न्यायालया पुढे राणा दाम्पत्यांच्या वतीनं वकिलांनी विनंती केली.
तर जामीनपात्र वॉरन्ट काढू: राणा दाम्पत्यांच्या वकिलांनी बाजू मांडल्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्पत्यांची कानउघडणी केली. न्यायाधीश राहुल रोकडे सुनावणीच्या दरम्यान म्हणाले की, यापुढे जर आरोपी सुनावणीकरिता हजर राहिले नाहीत तर जामीनपात्र वॉरंट त्यांच्या नावे काढले जाईल. ही शेवटची संधी आहे, असं त्यांनी समजावले. असा निर्णय करत पुढील सुनावणी 19 जानेवारी रोजी निश्चित केलेली आहे.
हेही वाचा: