ETV Bharat / state

वर्चस्ववादातून चुनाभट्टीत गोळीबार करणाऱ्या चार आरोपींना आठ तासात अटक - गोळीबार प्रकरण चुनाभट्टी

Gun Firing Case Chunabhatti : चुनाभट्टीतील आदर्श नगर परिसरात रविवारी दुपारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराने पुन्हा एकदा मुंबई हादरली आहे. (Shooting from Supremacy) चुनाभट्टी परिसरात वर्चस्वासाठी गुंड सुमित येरुणकर याची साथीदारांनी हत्या केल्याची (firing of hooligans in Chunabhatti) माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी अवघ्या आठ तासात चार आरोपींना अटक केली.

Gun Firing Case Chunabhatti
गुंडांना अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2023, 6:44 PM IST

गोळीबार प्रकरणाविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

मुंबई Gun Firing Case Chunabhatti : चुनाभट्टी भागात भरदिवसा गोळीबार केल्याचं उघडकीस आलय. (Shooting from Supremacy) गुंड सुमित येरुणकर याची साथीदारांनी हत्या केलीय. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली. पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी याविषयी माहिती दिली. अटक केलेल्या आरोपींची नावे सागर संजय सावंत (वय ३६ वर्षे), सुनील ऊर्फ सन्नी बाळाराम पाटील (वय ३७ वर्षे), नरेंद्र ऊर्फ नऱ्या गजानन पाटील (वय ४२ वर्षे), आशुतोष ऊर्फ बाबू देविदास गावंड (वय २५ वर्षे, सर्व राहणार- चुनाभट्टी) अशी आहेत.

किमान १० राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या : काल (रविवारी) दुपारी चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या ह‌द्दीत चार इसमांनी बंदुकीचा वापर करून सहा जणांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये एका सुमित येरुणकर या इसमाचा मृत्यू झाला असून एका अल्पवयीन मुलीसह चार इसम जखमी झाले. रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास चुनाभट्टी येथील आझाद गली येथे किमान १० राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत गँगस्टर सुमितचा मृत्यू झाला. त्याचे दोन साथीदार रोशन लोखंडे आणि आकाश खंडागळे यांनाही गोळ्या लागल्या. याशिवाय तेथून जात असलेले मदन पाटील आणि 8 वर्षीय त्रिशा शर्मा हेही जखमी झाले. सर्व जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती स्थिर आहे.

पूर्ववैमनस्यातून खून : या घटनेवरून चुनाभट्टी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेची माहिती प्राप्त होताच परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ९ पोलीस पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने संपूर्ण घटनेचा कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना आठ तासांच्या आत अटक केली. या गोळीबारात मृत्यू झालेला सुमित येरूणकर हा तसंच अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. गोळीबाराचा गुन्हा हा आपापसातील पूर्ववैमनस्यातून झाल्याचं निष्पन्न झालं आहे. अटक आरोपींना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रम चव्हाण करत आहेत.

हेही वाचा:

  1. फार्महाऊसवर दरोडा टाकून दागिन्यांसह ५५ सोयाबीनचे पोते लंपास, विरोध करणाऱ्या तरुणाच्या पोटात खुपसला चाकू
  2. सातार्‍यात 13 वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून, सहा दिवसातील हत्येची पाचवी घटना
  3. अरबी समुद्रात इस्रायलच्या जहाजावर ड्रोन हल्ला; जहाजावरील २० भारतीयांसह सर्व कर्मचारी सुखरूप, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.