ETV Bharat / state

पंजाबमध्ये एकच शिवसेना, बोगस संघटनेशी काडीचा संबंध नाही - गुलाबचंद दुबे - पंजाब शिवसेना संघटन

पंजाबमध्ये बोगस शिवसेना चालत असल्याची तक्रार राष्ट्रीय संघटक अशोक तिवारी यांनी केली होती. यावर 'पंजाबमध्ये बोगस शिवसेना असल्याच्या वावड्या उठल्या असल्या तरी येथे एकच संघटन काम करते', असे स्पष्टीकरण पंजाबमधील शिवसेनेचे संघटन प्रमुख गुलाबचंद दुबे यांनी दिले आहे.

mumbai
mumbaii
author img

By

Published : Jun 24, 2021, 8:09 PM IST

मुंबई - पंजाबमध्ये बोगस शिवसेना असल्याच्या वावड्या उठल्या असल्या तरी येथे एकच संघटन काम करते, असे स्पष्टीकरण पंजाबमधील शिवसेनेचे संघटन प्रमुख गुलाबचंद दुबे यांनी दिले आहे. पंजाबमध्ये बोगस शिवसेना चालत असल्याची तक्रार राष्ट्रीय संघटक अशोक तिवारी यांनी केली होती. यावर गुलाबचंद दुबे यांनी हे स्पष्ट केले.

'इतर संघटनेशी शिवसेनेचा काडीचाही संबंध नाही'

'पंजाबमध्ये शिवसेनेचे अधिकृत लोक काम करतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने कोणत्याही संघटना कार्य करत नाहीत. पंजाबमध्ये हिंद सेना, हिंदूस्थान सेना अशा विविध संस्था कार्यरत आहेत. शिवसेनेशी त्यांचा काडीचा संबंध नाही. शिवसेना ही एकच संघटना आहे, ती दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या विचाराने चालते. येथे आमची संघटना मजबूत काम करत आहे', असे पंजाबचे शिवसेना संघटन प्रमुख गुलाबचंद दुबे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

'शिवसेना पंजाबची निवडणूक लढवणार'

'पंजाबमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना सहभाग घेईल. किती जागा लढवायच्या याबाबत अधिकृत निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील', असे संघटन प्रमुख दुबे यांनी सांगितले.

पंजाब निवडणुकीवर अरविंद सावंत

'शिवसेनेने देशातील विविध भागात पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. त्या त्या भागात ते पदाधिकारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहून कार्यरत आहेत. एखाद्या ठिकाणी निवडणूक लढवायची असल्यास त्याचा निर्णय पक्षाच्या प्रमुखांकडून घेतला जातो. पंजाबच्या बाबतीत पक्षप्रमुख निर्णय घेतील', असे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.

'बोगस शिवसेना बंद पाडण्यात येतील'

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकाळात शिवसेनेचा देशभरात दरारा होता. प्रादेशिक स्तरावर एकच संघटन चालायचे. आता बोगस शिवसेना संस्था चालत असल्याची तक्रार पंजाबमध्ये शिवसेना राष्ट्रीय संघटक अशोक तिवारी यांनी केली आहे. 'बोगस शिवसेना संघटनांची पोलीस ठाण्यात तक्रार करुन त्या संघटना बंद पाडण्यात येतील', असे तिवारी यांनी म्हटले.

शिवसेनेचे प्रादेशिक राजकारण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली. इतर राज्यातील प्रादेशिक राजकारणात शिवसेना केंद्रबिंदू होती. ज्याप्रमाणे तामिळनाडूत द्रमुक हा प्रादेशिक पक्ष होता. तसेच पंजाबमध्ये अकाली दल, पश्चिम बंगालमध्ये बांगला काँग्रेस आणि कम्युनिस्ट; बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात काँग्रेस विरोधी पक्षांची (मुख्यत: स्थानिक-प्रादेशिक पक्षांची) आघाडी असे वातावरण होते. त्यावेळी देशात प्रादेशिक, भाषिक, जातीय आणि धार्मिक संघटनांचा जोर उफाळून येत होता. मुंबईसह महाराष्ट्रात शिवसेनेचा आवाज होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचा कारभार पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आला. गेल्या 8 वर्षात त्यांनी पक्ष वाढीवर भर दिला आहे. यामुळे केंद्राच्या राजकारणात शिवसेनेकडे प्रामुख्याने पाहिले जात आहे.

हेही वाचा - राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका; घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.