ETV Bharat / state

ST Workers Strike : पालकमंत्री, आमदार करणार एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी

author img

By

Published : Nov 25, 2021, 8:39 PM IST

विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. पालकमंत्री, आमदारांनी त्यांची मनधरणी करून कर्मचाऱ्यांची समजूत काढावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) , उपुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आज (दि. 25) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. संपकरी याला प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे.

मंत्रालय
मंत्रालय

मुंबई - विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ( ST Workers ) ठाम आहेत. पालकमंत्री, आमदारांनी त्यांची मनधरणी करून कर्मचाऱ्यांची समजूत काढावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) , उपुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आज (दि. 25) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. संपकरी याला प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे.

संपाचा तिढा कायम

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात ठाण मांडले आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने भरघोस वेतनवाढ दिली. पण, विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. दुसरीकडे संप मागे न घेतल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे, असा इशारा महमंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब ( Anil Parab ) यांनी दिला आहे. यामुळे कामगारांवर निलंबनाची कारवाई झाल्यास संप चिघळण्याची शक्यता आहे.

लोकप्रतिनिधींवर जबाबदारी

विलिनीकरणाच्या मुद्द्यांवर न्यायालयाने समिती नेमली आहे. बारा आठवड्यांनी समितीचा अहवाल येईल. तोपर्यंत संप सुरू राहिल्यास महामंडळाचे मोठे नुकसान होईल. राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवरही संशकता निर्माण होईल. संपाचा तिढा सोडवण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी, आमदारांनी पुढाकार घ्यावा. कामगारांची समजूत घालावी. महामंडळ तोट्यात असतानाही सुमारे 41 टक्क्यांची पगारवाढ दिली. विलिनीकरण वगळता उर्वरीत मागण्या आधीच मान्य केल्या आहेत. तरीही काही समस्या असतील तर, राज्य सरकारसोबत चर्चा करा. चर्चेतून मार्ग निघतो, हे समजून सांगण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लोक प्रतिनिधींवर सोपवली आहे. ते कशापद्धतीने मनधरणी करतात, हे पाहावे लागणार आहे.

हे ही वाचा - ‘कामावर हजर व्हा अन्यथा...’; एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा 24 तासांचा अल्टीमेटम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.