मुंबई : Richest Ganpati in Mumbai : महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची (Ganeshotsav २०२३) जय्यत तयारी सुरू आहे. यातच मुंबईतील GSB सेवा मंडळानं आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी सर्वात महागड्या गणेश मूर्तीची स्थापना केलीय. GSB सेवा मंडळ मुंबईतील सर्वात श्रीमंत मंडळ म्हणून (Ganesh Chaturthi २०२३) ओळखलं जातं. यावेळी मंडळानं गणेशाच्या मुर्तीवर सोन्या-चांदीचा वर्षाव केलाय.
काय आहेत मुर्तींची वैशिट्ये : यावर्षी या मंडळाची गणेशाची ही मूर्ती 69 किलो सोनं आणि 336 किलो चांदीची आहे. यासाठी GSB सेवा मंडळानं 360.45 कोटी रुपयांचा विमाही काढल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आलीय. यंदा हे मंडळ ६९ वा गणेशोत्सव साजरा करणार आहे. या गणेशमूर्तीमध्ये 36 किलो चांदी आणि 250 ग्रॅम सोन्याचं लॉकेटही तयार करण्यात आलंय. गणरायाच्या मुर्तीच्या सुरक्षेसाठी फेशियल रेकग्निशन बसवण्यात आल आहे. याठिकाणी पाळत ठेवण्यासाठी उच्च घनतेचे सीसीटीव्ही कॅमेरे वापरत असल्याचंही मंडळाकडून सांगण्यात आलंय.
- 'अंधेरीचा राजा'कडे अडीच कोटी रुपये किमतीचे दागिने आहेत. सोन्याचा मूषक, चांदीची पाऊले आणि हिरेजडीत मुकूट आहे. यांची किंमत अडीच कोटी रुपये आहे.
गणेशोत्सव स्पर्धेत भाजपाकडून लाखोंची बक्षीसं : मुंबई भाजपातर्फे गणेशोत्सवाचे जोरदार स्वागत करण्यासाठी मुंबई भाजपाची टिम तयार झाली आहे. गतवर्षी प्रमाणं याही वर्षी मुंबईचा मोरया ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. तसंच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 6 ट्रेन आणि 338 एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलारांनी दिलीय. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गणेशोत्सव, दहिहंडी उत्सव, नवरात्र उत्सवासह विविध सण उत्साहात जल्लोषात साजरे करण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या मंगळागौर स्पर्धेनंतर आता "मुंबईचा मोरया" या भव्य गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे याही वर्षी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी नुकतेच दिलीय.
हेही वाचा :